बुलडाणा - सोयाबीन-कापूस प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत मंत्रालयात बैठकीसाठी मुबंईला जात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांच्या वाहनाला चिखलीतील बेराळा फाट्याजवळ 22 नोव्हेंबरला रात्री रस्ता क्रॉस करणाऱ्या बाईकसोबत अपघात झाला. या अपघातात बाईक चालविणारा युवक सोळंकी तसेच तुषार गणेश परिहारला जबर मार लागला आहे.
Buldana accident : मुंबईत बैठकीला जातांना तुपकरांच्या वाहनाला अपघात, दोघे दुचाकीस्वार जखमी - ajit pawar meeting
सोयाबीन-कापूस प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत मंत्रालयात बैठकीसाठी मुबंईला जात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांच्या वाहनाला चिखलीतील बेराळा फाट्याजवळ 22 नोव्हेंबरला रात्री रस्ता क्रॉस करणाऱ्या बाईकसोबत अपघात झाला. यात रविकांत तुपकरांनी प्रसंगवधान राखत जखमींना रुग्णालयात नेले.
या अपघातात तुपकर यांच्या वाहनांचे खूप नुकसान झाले असून रविकांत आणि त्यांचा वाहन चालक सुरक्षित आहे. विशेष म्हणजे तुपकरांनी स्वतः या दोन्ही जखमींना तात्काळ चिखली आणि नंतर औरंगाबादला पुढील उपचारासाठी घेऊन गेले. तुपकर यांच्याकडे सौरभ सावजी यांची इनोव्हा कार आहे. याच वाहनातून ते मुंबईसाठी जात होते. रविकांत यांनी अपघाती वाहन चिखली येथील पोलीस स्टेशनमध्ये लावले.
अचानक युवक समोर आल्याने दुर्घटना घडली - रविकांत तुपकर
आम्ही मुंबई येथे विशेष मीटिंग साठी जाताना बेराळा फाट्याजवळ अचानकच दोन युवक मोटर सायकल घेऊन रस्त्यात आडवी आली. ही घटना अचानक घडली. मोटारसायकल चालवणारा हा युवक नवा होता.त्याला मोटारसायकल बरोबर चालवता येत नाही. सध्या दोघांना उपचारासाठी औरंगाबाद कडे घेऊन जात आहे. अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली. या प्रकरणात तुपकरांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेचे कौतुक होत आहे.
हेही वाचा -Curfew relaxation in Amravati : अमरावतीत सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत बाजारपेठ सुरू