महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 6, 2019, 10:04 PM IST

ETV Bharat / state

बुलडाण्यात गारपीटीने पिकांचे नुकसान; शेतकरी हतबल

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मेहेकर, लोणार व बुलडाणा या चार तालुक्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडत आहे. गारपीट झाल्याने शेतातील उभी पिके नष्ट झाली आहेत.

बुलढाण्यात गारपीट

बुलडाणा - बुलडाणा तालुक्यात गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला. या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील चिखली, मेहेकर, लोणार व बुलडाणा या चार तालुक्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडत आहे.

बुलडाणा जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतातील उभी पिके नष्ट


काही ठिकाणी रविवारी दुपारी गारपीट झाल्याने शेतातील उभी पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

हेही वाचा - गोवंडीतील 'लखपती' भिकाऱ्याचा रेल्वे अपघातात मृत्यू

बुलडाणा तालुक्यातील सव, रुईखेड टेकाळे, नांद्राकोळी, खुपगाव, कोलवड या भागात गारपिटीचे प्रमाण जास्त आहे. सोयाबीन, कापसासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details