बुलडाणा :जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. दरम्यान हा निर्णय घेण्याच्या काही तास आधीच जिल्ह्यात 15 मार्चपर्यंत लॉकडाऊनचा निर्णय जारी करण्यात आला होता. त्यामुळे हा निर्णय काही तासांतच का रद्द करण्यात आला याची चर्चा आता होताना दिसत आहे.
बुलडाण्यात संपूर्ण लॉकडाऊन नाही, निर्बंधांसह दुकाने राहतील सुरू - dinesh gite
बुलडाण्यात बुधवारी कोरोनाचे 755 तर गुरूवारी 567 रुग्ण आढळले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाकडून 12 मार्च ते 15 मार्च पर्यंत कडक लॉकडाऊनचा आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला. मात्र काही तासांतच हा आदेश रद्द करून केवळ रविवारचा आठवडी बाजार बंद राहील असा सुधारीत आदेश प्रशासनाकडून काढण्यात आला.
बुलडाण्यात बुधवारी कोरोनाचे 755 तर गुरूवारी 567 रुग्ण आढळले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाकडून 12 मार्च ते 15 मार्च पर्यंत कडक लॉकडाऊनचा आदेश शुक्रवारी जारी करण्यात आला. मात्र काही तासांतच हा आदेश रद्द करून केवळ रविवारचा आठवडी बाजार बंद राहील असा सुधारीत आदेश प्रशासनाकडून काढण्यात आला. त्यामुळे नव्या आदेशानुसार बुलडाण्यात सर्व दुकाने सकाळी आठ ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील. तर 16 मार्चपर्यंत आठवडी बाजार बंद राहतील.
लॉकडाऊनचा निर्णय रद्द केल्याची चर्चा
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता लॉकडाऊन लावण्याचा निर्णय प्रशासने घेतला होता. मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाही अचानक काही तासांतच प्रशासनाने लॉकडाऊन मागे घेण्याचा निर्णय का घेतला असावा यावर आता जिल्ह्यात चर्चा होताना दिसत आहे.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी 12 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजेपासून सोमवारी 15 मार्च रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्ह्यात जीवनावश्यक दुकाने वगळता इथर दुकाने बंद ठेवली जातील अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी सुरूवातीला दिली. यानंतर काही तासांतच लॉकडाऊनला नागरिक आणि व्यावसायिकांचा विरोध असल्याचे सांगत सर्व दुकाने सकाळी 8 ते सायंकाळी पाच पर्यंत सुरू राहतील असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा -नागपुरात पावसाची हजेरी, वातावरणात गारवा