महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑक्सिजनमूळे मृत्यू झाले नसल्याचा केंद्र सरकारचा दावा खोटा -मुकूल वासनिक - भारतीय राज्यघटना

सरकारमध्ये ज्या लोकांनी भारतीय राज्यघटनेला साक्षी ठेऊन शपथ घेतली आहे, त्याच त्याच लोकांपासून भारतीय राज्यघटनेला आव्हान आहे, हे स्वातंत्र्यदिनी आपण समजून घेतले पाहिजे. तसेच याच लोकांपासून भारताच्या संसदेला, न्याय व्यवस्थेला व लोकशाही व्यवस्थेला धोका आहे, अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक यांनी केली आहे. ते बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे बोलत होते.

काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक
काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक

By

Published : Aug 16, 2021, 4:24 PM IST

बुलडाणा - ऑक्सिजनमूळे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा केंद्र सरकारचा दावा खोटा असल्याची, परखड टीका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी केली आहे. रविवारी स्वतंत्रदिनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोन्द्रे यांच्या अनुराधा कोविड सेंटरमध्ये स्व.राजीव गांधी ऑक्सिजन निर्मिती प्लांटचा लोकार्पण सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, सरकारमध्ये ज्या लोकांनी भारतीय राज्यघटनेला साक्षी ठेऊन शपथ घेतली आहे, त्याच त्याच लोकांपासून भारतीय राज्यघटनेला, भारताच्या संसदेला, न्याय व्यवस्थेला व लोकशाही व्यवस्थेला धोका आहे, अशी टीकाही वासनिक यांनी केली आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक चिखली येथे कार्यक्रमात बोलताना

'केंद्र सरकारचा हा दावा खोटा'

देशात 2 ते 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन होता. त्यावेळी आणखी जवळपास 9 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. यासाठी केंद्र सरकारने ऑक्सिजनची पूर्तता करण्यासाठी नेव्ही, रेल्वे लावले. तसेच, ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू केल्या. ते कशाला लावल्या होत्या? असा प्रश्न उपस्थित करत, याबाबत अधिवेशनात केंद्र सरकारकडून ऑक्सिजनमूळे कोरोनाचा रुग्ण दगावला की नाही, याची माहिती सांगितली गेली नाही, याचा अर्थ ऑक्सिजनमूळे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा केंद्र सरकारचा दावा खोटा असल्याची टीका वासनिक यांनी केली आहे.

'कोरोना रुग्णाची आकडेवारी किती खरी,किती खोटी'

जगात 21 कोटी 77 लाख 26 हजार 483 लोकांना कोविडची बाधा झाली होती. 43 लाख 83 हजार 81 लोक मृत्युमुखी पडले, हा अधिकृत आकडा किती खरा, किती खोटा हे कुणीही सांगू शकत नाही, असा दावाही वासनिक यांनी यावेळी केला आहे. आपल्या देशात 3 कोटी 22 लाख नागरिकांना कोवीड झाला असून, त्यापैकी 4 लाख 31 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा संशयास्पद आहे. गंगेत किती प्रेत सोडली, गंगाकिनारी किती गाडली, याची आकडेवारी सरकारकडे नाही. ही भयानक परिस्थिती आहे, असा आरोपही वासनिक यांनी केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड,जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे,मलकापूर आमदार राजेश ऐकडे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मनीषा पवार,माजी जिल्हाध्यक्ष विजय अंबोरे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, मेहकर नगराध्यक्ष कासम गवळी,शाम उमाळकर, महिला प्रदेश सरचिटणीस एड जयश्री शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details