महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ravikant Tupkar News : संघटनेत राहूनच मी काम करणार, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांकरता लढणार - रविकांत तुपकर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुण्यात होणाऱ्या शिस्तपालन समितीच्या बैठकीला आज शेतकरी नेते रविकांत तुपकर उपस्थित नाहीत. यावर तुपकर यांनी बुलढाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, संघटनेत राहूनच मी काम करणार आहे.

Ravikant Tupkar News
शेतकरी नेते रविकांत तुपकर

By

Published : Aug 8, 2023, 1:01 PM IST

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया

बुलढाणा :स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज पुण्यात शिस्तपालन समितीची बैठक होत आहे. मात्र या बैठकीला रविकांत तुपकर गैरहजर आहेत. त्यांनी बुलढाण्यातूनच त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. शिस्तपालन समितीसमोर जाण्यासाठी रविकांत तुपकर तयार नाहीत. मात्र शिस्तपालन समितीतील वरिष्ठांना आधीच त्यांनी सातत्याने होत असलेल्या आक्षेपाबाबत माहिती दिली होती. त्यामुळे शिस्तपालन समितीकडे जाणे शक्य नसले, तरी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राहूनच शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे, अशी भूमिका तुपकर यांनी स्पष्ट केली आहे.



रविकांत तुपकर यांची भूमिका : आपण मागील पाच वर्षापासून पक्ष श्रेष्ठींना आपले म्हणणे वारंवार सांगितले आहे. त्यामुळे आता त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. कोणताही निर्णय झाला तरी आपण याच संघटनेत राहून पक्ष वाढीकरिता काम करत राहू, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत नेमके काय निर्णय होतात, ते पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. एकंदरीत आता शिवसेना, राष्ट्रवादी, पाठोपाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्येही तुपकर यांचा वेगळा गट तयार होणार का? स्वाभिमानी शेतकरी संघटना दुसऱ्यांदा फुटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


शेवटपर्यंत शेतकऱ्यांकरिता लढणार :मला आजच्या बैठकीचा निरोप मिळाला होता, पण वरील सर्व बाबी मी वारंवार पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहोचवल्या आहेत. शेतकरी माझा प्राण आहे, माझा आत्मा आहे. मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांकरिता लढत राहील, असेही त्यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्येच मी आज आहे. पुढील निर्णय पक्षश्रेष्ठींनी घ्यायचा आहे, असाही त्यांनी पुनरूच्चार केला आहे. मी आजपासून कामाला लागलो आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


संघटनेत फूट पडण्याच्या चर्चांना सुरूवात :रविकांत तुपकर यांनी 2 ऑगस्ट रोजी तातडीने कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना आमचीच आहे, असा दावा देखील केला होता. तेव्हापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडते की काय, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावेळी त्यांनी संघटनेतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. महाराष्ट्रभर तरुणांची फौज उभी करणार असल्याचे विधान देखील त्यांनी केले होते.



हेही वाचा :

  1. Ravikant Tupkar News: शिवसेनेसह राष्ट्रवादीनंतर स्वाभिमानी संघटनेत फूट पडणार? रविकांत तुपकर यांनी केला मोठा दावा
  2. Ravikant Tupkar: मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर रक्तपात होईल, रविकांत तुपकरांचा इशारा
  3. Ravikant Tupkar On Sunil Shetty: टोमॅटो खाल्ले नाही तर सुनील शेट्टी मरणार नाही - रविकांत तुपकर

ABOUT THE AUTHOR

...view details