बुलडाणा -मानधनाचे दोन महिन्याचे बिल काढण्यासाठी उपकोषगार अधिकाऱ्याला कंत्राटी कर्मचाऱ्याकडून ३ हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात अटक करण्यात आले. प्रमोद आनंदराव मोहोड असे त्या लाचखोर उपकोषागार अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मंगळवारी दुपारी केली.
दोन महिन्याचे मानधन काढण्यासाठी मागितले होते 6 हजार
कंत्राटी कर्मचाऱ्याच्या दोन महिन्याचे मानधन काढण्यासाठी मोताळा येथील उपकोषागार अधिकारी प्रमोद आनंदराव मोहोड (वय 47) यांनी तक्रारदार कंत्राटी कर्मचाऱ्यास 6 हजार रुपयाची मागणी केली होती. तडजोडीअंती दोन टप्यामध्ये पैसे देण्याचे निश्चीत झाले. यातील पहिला
टप्पा 3 हजार रुपये देण्यापुर्वी कंत्राटी कर्मचाऱ्याने लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या कार्यालयात रितसर तक्रार नोंदवली.
मोहोड यांना पडकले रंगेहात