महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bharat Jodo Yatra : 'भारत जोडो' यात्रेत बचतगटांच्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग - खासदार राहुल गांधी

खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi in Buldana) यांच्या नेतृत्वात निघालेल्या 'भारत जोडो' पदयात्रेत दिशा बुलडाणा (Bharat Jodo yatra Buldana) जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या महिलांनी १९ नोव्हेंबर रोजी उत्स्फूर्त सहभाग (women of Buldana in Bharat Jodo Yatra) नोंदवला. भारत जोडो पदयात्रा १८ नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यात पोहचली. शेगाव येथे खासदार राहुल गांधी यांची विराट सभा झाली. women of Buldana in Bharat Jodo Yatra, latest news from Buldana, Buldana Update

Bharat Jodo Yatra
भारत जोडो यात्रा, बुलडाणा

By

Published : Nov 20, 2022, 12:51 PM IST

बुलडाणा : खासदार राहुल गांधी (MP Rahul Gandhi in Buldana) यांच्या नेतृत्वात निघालेल्या 'भारत जोडो' पदयात्रेत दिशा बुलडाणा (Bharat Jodo yatra Buldana) जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या महिलांनी १९ नोव्हेंबर रोजी उत्स्फूर्त सहभाग (women of Buldana in Bharat Jodo Yatra) नोंदवला. ''नफरत छोडो, भारत जोडो, कोण चलेगा भाई कोण चलेगा.. हम चलेंगे भाई हम चलेंगे'' अशा घोषणा देत त्यांनी पदयात्रेत उत्साह भरला. भगवे फेटे आणि हिरव्या रंगाची साडी अशा पारंपरिक वेषभूषेतील महिलांनी सर्वांचे लक्ष वेधले. women of Buldana in Bharat Jodo Yatra, latest news from Buldana, Buldana Update

भारत जोडो यात्रेचा उत्साह वाढविताना महिला बचतगट


पारंपरिक वेशभूषा आणि भजनांची रंगत -भारत जोडो पदयात्रा १८ नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्यात पोहचली. शेगाव येथे खासदार राहुल गांधी यांची विराट सभा झाली. शनिवारी सकाळी ही पदयात्रा शेगाव येथून जळगाव जामोदकडे रवाना झाली. दरम्यान माटरगाव बु. येथे दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेळके यांच्या नेतृत्वात बचतगटांच्या महिलांनी यात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नफरत छोडो, भारत जोडो..कोण चलेगा भाई कोण चलेगा.. हम चलेंगे भाई हम चलेंगे अशा जोरदार घोषणा देत 'भारत जोडो' यात्रेत उत्साह भरला. पारंपारिक वेशभूषेतील महिलांनी सर्वांचे लक्ष वेधले.

'भारत जोडो' यात्रा मध्य प्रदेशात जाणार-भजन गात आणि पावली खेळत महिलांनी आपला भरभरुन सहभाग दर्शवला. प्रदेश काँग्रेसच्या सचिव तथा दिशा बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री शेळके बाळापूरपासून भारत जोडो पदयात्रेत चालत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातून ही पदयात्रा मध्यप्रदेशच्या हद्दीत प्रवेश करण्यापर्यंत त्या यात्रेत पायी चालणार आहेत.


१० हजार एनर्जी ड्रिंक्सचे वाटप -शेगाव येथून जळगाव जामोदकडे निघालेल्या भारत जोडो पदयात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांना दिशा बचतगट फेडरेशनच्या वतीने १० हजार एनर्जी ड्रिंक्सचे वाटप करण्यात आले. तसेच बचतगटांच्या महिलांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या वस्तू भेट म्हणून दिल्या. भारत जोडो पदयात्रेच्या समर्थनार्थ बचतगटांच्या महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

ABOUT THE AUTHOR

...view details