महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात मोटार सायकल रॅली

शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा शहरात मोटार सायकल रॅली काढण्यात आली. स्थानिक जयस्तंभ चौकातील मातोश्री कार्यालयासमोरुन हजारो युवकांनी ही रॅली काढून शहरात भगवे वादळ निर्माण केले. यावेळी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचा जयघोष करण्यात आला.

शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात मोटार सायकल रॅली

By

Published : Jul 28, 2019, 10:00 PM IST

Updated : Jul 28, 2019, 11:02 PM IST

बुलडाणा - शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा शहरात मोटार सायकल रॅली काढण्यात आली. स्थानिक जयस्तंभ चौकातील मातोश्री कार्यालयासमोरुन हजारो युवकांनी ही रॅली काढून शहरात भगवे वादळ निर्माण केले. यावेळी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचा जयघोष करण्यात आला.

शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाण्यात मोटार सायकल रॅली

जयस्तंभ चौक, जनता चौक, कारंजा चौक, त्रिशरण चौक, चांडक ले-आऊट, सर्क्युलर रोड मार्गे चिंचोले चौक, गजानन महाराज चौक, बसस्थानक, संगम चौकातून प्रचंड उत्साहात शिवसैनिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत रॅली काढली. रॅलीनंतर सामान्य रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ व फळेवाटप करण्यात आले.

या रॅलीचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांनी केले. तर रॅलीमध्ये माजी उपजिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे, तालुका प्रमुख मधुसूदन सावळे, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, विजय जायभाये, बाळू धूड, श्रीकांत गायकवाड, श्रीकृष्ण शिंदे, बाबा कुरेशी, विजय सुरडकर, रमेश कोठाडे, प्रविण जवरे, विश्वंभर लांजुळकर, मोहन पऱ्हाड, संजय पाटील, दिपक तुपकर, प्रवीण निमकर्डे, जीवन उबरहंडे, मृत्यूंजय गायकवाड, नंदू लवंगे, सचिन परांडे, राजू मुळे, अरुण ढोरे, गोपाल भाग्यवंत, निलेश पाटील, गुलाब शिराळे, शेख जुबेर मणियार, शेख शाहरुख बागवान, फिरोज खान, राजेश पडोळकर, गणेश राजस, अनंता दिवाणे, प्रवीण जाधव यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Last Updated : Jul 28, 2019, 11:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details