महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदुरा येथे शिवजयंतीनिमित्त दुमदुला 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोष - shivjayanti festival

जिल्ह्यातील नांदुरा येथे शिवजयंती निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेमध्ये शिवाजी महाराज आणि मावळ्याच्या रुपातील वेशभुषा साकारण्यात आली होती.

शिवजयंती शोभायात्रा

By

Published : Mar 24, 2019, 10:31 AM IST

बुलडाणा- हिदंवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार (२३ मार्च) जयंती साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील नांदुरा येथे शिवजयंती निमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेमध्ये शिवाजी महाराज आणि मावळ्याच्या रुपातील वेशभुषा साकारण्यात आली होती.

शिवजयंती शोभायात्रा

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे माजी नगराध्यक्ष राजेश एकडे यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता 'जय भवानी जय शिवराय'च्या घोषणा देत अंबादेवीच्या गडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शोभा यात्रेला सुरुवात झाली.

शोभा यात्रेत शिवाजी महाराज आणि आणि मावळ्यांची वेषभुषा साकारण्यात आली होती. मावळ्याच्या समवेत घोड्यावरस्वार छत्रपती शिवाजी अशी मिरवणुक निघाली होती. ही शोभायात्रा शहरात पोहचल्यानंतर ड्रोनच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. या शोभायात्रेमध्ये सर्व धर्म, सर्वपक्षीय नेते पदाधिकारी शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


ABOUT THE AUTHOR

...view details