बुलडाणा- राज्यात आरक्षण मर्यादा 50 टक्क्याच्या वर असू नये, या प्रमुख मागणीसाठी बुलडाण्यात 'सेव मेरिट, सेव नेशन' समितीच्या वतीने ऑगस्ट क्रांती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. आरक्षण मर्यादा 50 टक्केच्या वर असू नये तसेच दर 5 वर्षांनी आरक्षणाची समीक्षा घेण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी मार्फत राज्यपालांना पाठवण्यात आले. या विराट मोर्चात हजारोंच्या संख्येने सर्व जाती-धर्माचे नागरिक सहभागी होते.
50 टक्के आरक्षण मर्यादा: बुलडाण्यात 'सेव मेरिट, सेव नेशन'चा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - बुलडाणा
आरक्षण मर्यादा 50 टक्केच्या वर असू नये तसेच दर 5 वर्षांनी आरक्षणाची समीक्षा घेण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी जिल्हाधिकारी मार्फत राज्यपालांना पाठवण्यात आले.
राज्यात मराठा समाजाला 14 टक्के आरक्षण दिल्यानंतर राज्यात एकूण 78 टक्के पर्यंत आरक्षणाची वाढ झाली आहे. वाढलेल्या आरक्षणामुळे सर्वसाधारण जमातीवर अन्याय होत, असल्याचा आरोप करत बुलडाण्यात जिल्हास्तरीय विराट मोर्चा काढण्यात आला. दुपारी शारदा ज्ञानपीठ स्कूल येथून मोर्चाची सुरुवात झाली, तहसील चौक, संगम चौक, जयस्तंभ चौक मार्गे हा मोर्चा निघाला.
हातात फलक घेऊन, सेव मेरिट, सेव नेशन, मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ च्या घोषणा देत अनेक विद्यार्थी व सर्व जातीचे नागरिक मोर्चात सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. आरक्षण 50 टक्केपेक्षा अधिक नसावे, सरकारने समिती तयार करून आरक्षणाची समीक्षा करावी, जोपर्यंत यावर निर्णय होत नाही, तोपर्यंत आरक्षण लाभ घेणाऱ्यांना ओपनमध्ये लाभ घेता येऊ, नये अशी तरतूद करावी. एक व्यक्ती, एक आरक्षण निधी अवलंबन करावी, यासह विविध मागण्याचे निवेदन शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्यांना दिले.