महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लालपरीला 32 लाखापेक्षा जास्त उत्पन्नाची अपेक्षा, रेल्वेस्थानकाला यात्रेचे स्वरूप - बुलढाणा

सैलानी बाबांच्या यात्रेसाठी महाराष्ट्रापेक्षा आंध्रप्रदेश, आणि कर्नाटकमधून जास्त भाविक येतात. बुलडाण्याकडे जाण्यासाठी जालना स्थानकावरून एसटी महामंडळाने विशेष बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. गेल्यावर्षी ७१२ फेऱ्यांमध्ये २८ लाख २९ हजार रुपये उत्पन्न लालपरीला झाले होते.

लालपरीला 32 लाखापेक्षा जास्त उत्पन्नाची अपेक्षा, रेल्वेस्थानकाला यात्रेचे स्वरूप

By

Published : Mar 22, 2019, 8:59 PM IST

बुलढाणा -जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या यात्रेनिमित्त प्रवाशांच्या होणाऱ्या वाहतुकीतून लालपरीला गेल्यावर्षीपेक्षा जास्त उत्पन्न अपेक्षित आहे. या यात्रेनिमित्त जालना स्थानकावर होत असलेल्या गर्दीमुळे स्थानकाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अवैध वाहतुकीने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सैलानी बाबांच्या यात्रेसाठी महाराष्ट्रापेक्षा आंध्रप्रदेश, आणि कर्नाटकमधून जास्त भाविक येतात. जालन्याहून यात्रेच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे सोयीस्कर असल्यामुळे सर्वांचा ओढा रेल्वे प्रवासाकडे आहे. १९ तारखेला सुरू झालेली यात्रेची गर्दी 29 तारखेपर्यंत राहणार आहे. बुलडाण्याकडे जाण्यासाठी जालना स्थानकावरून एसटी महामंडळाने विशेष बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. गेल्यावर्षी ७१२फेऱ्यांमध्ये २८लाख २९ हजार रुपये उत्पन्न लालपरीला झाले होते. या उत्पन्नात या वर्षी ४ लाख रुपये वाढ अपेक्षित असून ३२ लाखापेक्षाही जास्त उत्पन्न काढण्याचा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा मानस आहे. २१ तारखेपर्यंत १५७ एस टीच्या फेऱ्या झाल्या आहेत. यामधून ८ लाख रुपये उत्पन्न झाले आहे.

रेल्वेस्थानकाला जत्रेचे स्वरूप -


गेल्या ३ दिवसांपासून जालना रेल्वे स्थानकावर तुफान गर्दी आहे. रेल्वे प्रशासन देखील या गर्दीपुढे हतबल झाले आहे. त्याचसोबत परिसरात अवैध धंद्यांनीही डोके वर काढले आहे. त्यातीलच एक मोठा व्यवसाय म्हणजे प्रवासी वाहतुकीचा आहे. जालना स्थानकापासून सैलानी बाबांच्या यात्रेपर्यंत प्रवासी घेऊन जाणाऱ्या अवैध वाहतुकीने कळस गाठला आहे. एका एका वाहनात २० प्रवासी भरले जात आहेत. यामुळे या सर्व प्रवाशांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवासी वाहतुकीसाठी बसच्या येथे रांगा लागलेल्या असतानाही प्रवाशांना विविध प्रकारची आमिषे दाखवून त्यांना पळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकटे-दुकटे फिरणारे प्रवासी बसमधून तर पंधरा वीस जणांच्या परिवाराचा खासगी वाहतुकीतून प्रवास करण्याकडे कल आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details