महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यातील सैलानी यात्रेवर 'कोरोना'चे सावट; यात्रा रद्द करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - corona virus buldana

बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रेत लाखोंच्या संख्येत भारतातून भाविक येतात. कोरोना व्हायरस प्रकोप संपूर्ण जगात पहायला मिळत आहे. त्यात भारतातही आतातपर्यंत 29 जणांना कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी यावर्षीची सैलानी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुलडाण्यातील सैलानी यात्रा रद्द
बुलडाण्यातील सैलानी यात्रा रद्द

By

Published : Mar 5, 2020, 9:19 PM IST

बुलडाणा -चीननंतर जगात अनेक ठिकाणी 'कोरोना' विषाणूचे रूग्ण पहायला मिळत आहेत. याबरोबर भारतातही काही ठिकाणी या विषाणूची लागण झालेले 29 रूग्ण पहायला मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी यावर्षीची सैलानी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ही यात्रा दर्शनीय ठेवण्यात यावी किंवा रद्दच करावी याबाबत बुलडाणा शहर काँग्रेसने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

बुलडाण्यातील सैलानी यात्रा जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केली आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रेत लाखोंच्या संख्येत भारतातून भाविक येतात. कोरोना व्हायरस प्रकोप संपूर्ण जगात पहायला मिळत आहे. त्यात भारतातही आतातपर्यंत 29 जणांना कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी यावर्षीची सैलानी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाचे मुख्य सचिव अजय मेहता यांच्या सोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगमध्ये कोरोना बाबतची चर्चा झाल्याची जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -सोलापुरात 'कोरोना'चा रुग्ण नाही, अश्विनी रुग्णालयाचा खुलासा

यात्रेत उघड्यावर मांस विक्री करण्यात येते. यामुळे अस्वच्छता होते. त्यात कोरोनाचे सावट असल्यामुळे यात्रेत आरोग्य सुविधा ठेवा, तपासणी पथके ठेवा, तसेच यात्रा दर्शनीय ठेवा किंवा यात्रा रद्द करा, अशी मागणी बुलडाणा काँग्रेसने केली आहे. यासंदर्भात शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता काकस यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details