महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 8, 2019, 2:23 AM IST

ETV Bharat / state

'सबका साथ, सबका विकास' हाच माझा ध्यास - अॅड.आकाश फुंडकर

भाजप-शिवसेना महायुतीचे खामगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अॅड. आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ सोमवारी खामगाव येथे मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला आमदार आकाश फुंडकर यांनी संबोधित केले.

मुस्लिम समाज बांधवांचा विजय संकल्प मेळावा

बुलडाणा -मी कुणालाही तुरूंगामध्ये टाकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलेली नाही. आपण फक्त विकासावर भर दिला आहे. 'सबका साथ, सबका विकास' हाच माझा ध्यास आहे, असे प्रतिपादन आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी केले. खामगाव येथे झालेल्या मुस्लिम समाज बांधवांच्या विजय संकल्प मेळाव्यात फुंडकर बोलत होते.

अॅड. आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ सोमवारी खामगाव येथे मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा संपन्न


भाजप-शिवसेना महायुतीचे खामगाव विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अॅड. आकाश फुंडकर यांच्या समर्थनार्थ सोमवारी खामगाव येथे मुस्लिम समाजाचा भव्य मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला आमदार आकाश फुंडकर यांनी संबोधित केले.


खामगाव मतदार संघात मी निवडून येण्याआधी मुस्लीम बहुल भागात विकास कामे झाली नाहीत. त्यामुळे मुस्लीम समाज बांधवांची अवस्था वाईट झाली होती. त्यामुळे 'सबका साथ, सबका विकास' या केंद्र शासनाच्या धोरणानुसार मुस्लीमबहुल वस्त्यांसह संपूर्ण मतदार संघात मुलभूत सुविधांची कामे केली. या विकास कामांमुळे फक्त 5 वर्षात मतदार संघाचा चेहरा-मोहरा बदलू लागला आहे. येणा-या काळात दुप्पट कामे करून मतदार संघ समस्यामुक्त केल्याशिवाय राहणार नाही. आमदार नाही तर कामदार होऊन काम करण्याचा संकल्प आहे, असे अॅड. आकाश फुंडकर यांनी सांगितले.

हेही वाचा- भुसावळ्यात सामूहिक हत्याकांडानंतर तणावपूर्ण शांतता; घटनास्थळी जमावबंदी लागू


यावेळी भाजप सोशल मीडिया सेलचे सागर फुंडकर, मुस्लीम समाजाचे नेते हाजी बुढन खाँ, गनी काजी लाखनवाडा यांच्यासह भाजपा-शिवसेना महायुतीचे पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

हेही वाचा- जळगाव जिल्ह्यात बंडखोरीमुळे बदलणार राजकीय समीकरणे

भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजाननराव देशमुख, मोहम्मद जमादार, शोहरत खान, अनिस जमादार, गुलजम्मा शाह, गनी काजी लाखनवाडा यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. मुस्लीम समाज बांधव आमदार आकाश फुंडकर यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली. या विजय संकल्प मेळाव्याला सुमारे 5 हजार मुस्लीम समाज बांधवांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details