बुलडाणा- वाळू घाटावरून वाळूची उचल करण्याकरता घाटधारकाच्या व खनिकर्म विभागाच्या परवानगीविना वाळूघाटावर दुसऱ्याच्या नंबरची नोंदणी केल्याचा प्रकार शौर्या टेक्नोशॉप कंपनीने केला आहे. कंपनीने गोपनीयतेचा भंग करीत 37 ब्रासच्या बनावट रॉयल्टीवर ओरिजनल इनवाईस नंबर देण्याचा प्रतापही केला आहे. या प्रकरणात बुलडाणा शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी वाळू घाटधारक विलास मास्कर यांनी अनधिकृतपणे वापरण्यात आलेल्या 37 ब्रास रॉयल्टीच्या भरपाईची मागणी केली आहे. तसेच शौर्या टेक्नोशॉप कंपनीचे व नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर धारकांचे आणि बुलडाणा खनिकर्म विभागाचे काही संबंध आहेत काय? याची चौकशी करण्याकरिता जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे.
प्रतिक्रिया- अुनक्रमे शिवाजी कांबळे (पोलीस निरीक्षक, बुलडाणा), विलास मास्कर (तक्रार कर्ता), प्रमोद पाटील (प्रोजेक्ट मैनेजर,शौर्या टेक्नोशॉप कंपनी), आर बी मारबते (खनिकर्म अधिकारी). तसेच शेवटी प्रोजेक्ट मॅनेजर प्रमोद पाटील हे प्रात्यक्षिक दाखवताना. या प्रकरणात बुलडाणा जिल्ह्याच्या व जळगाव जिल्ह्याच्या देखील बनावट रॉयल्टया असल्याचे समोर आले आहे. तर राज्यात अशा प्रकारे हजारो बनावट रॉयल्ट्यावर बनावट इनवाईस नंबर टाकून गोरख धंदा सुरू आहे. या सर्व प्रकारामुळे आणि शौर्या टेक्नोशॉप कंपनीच्या कारभारामुळे शासनाचा कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडत आहे. विशेष म्हणजे बनावट रॉयल्ट्या ह्या नागपूर, अकोलासह अनेक जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत. यावर जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याची बनावट सही व शिक्के मारलेले आहे.
सदर प्रकरणात बुलडाण्याचे खनिकर्म अधिकारी आर. जी. मारबते आणि अकोला खनिकर्म अधिकारी डॉ. ए. पी. दोड यांना चौकशीसाठी नेमण्यात आले आहे. या प्रकरणात बुलडाणा शहर पोलिसात जिल्हा खनिकर्म अधिकारी मारबते यांच्या तक्रारीवरून कलम 420, 468, 471, 469, 34 भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे हे तपास करीत आहेत. यामध्ये आरोपीचा शोध सुरू असून प्रकरणाचा पर्दा फाश करणार असल्याचे मत पोलीस निरीक्षक शिवाजी काबंळे यांनी सांगितले आहे.
डूब्लिकेट रॉयल्टीवर ओरिजनल इनवाईस नंबर देण्याचा प्रताप शौर्या टेक्नोशॉप कंपनीने केला आहे. शौर्या टेक्नोशॉप कंपनी मार्फत गोपनीयतेचा भंग
शासनाने महसूल वाढविण्यासाठी आणि स्वच्छ प्रशासन ठेवण्यासाठी वाळू विकण्याकरता ऑनलाइन पद्धतीने रॉयल्टी देण्याचे सुरू केले आहे. यानुसार नोंदणी झालेल्या मोबाईल क्रमांकावरून ऑनलाइन इनवाईस नंबर दिला जातो. अशा प्रकारे ऑनलाइन पद्धतीचे कार्य करण्याकरिता गेल्या पाच वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राचा ठेका शौर्या टेक्नोशॉप कंपनीला दिलेला आहे. मात्र, शौर्या टेक्नोशॉप कंपनी मार्फत रॉयल्टीवर छापण्यात आलेला बारकोड हा अनुक्रमांकानुसार छापण्यात येत आहे. अनुक्रमांकानुसार बारकोड छापल्यामुळे वाळू घाटधारकाच्या परवानगी विना दुसऱ्याचा मोबाईल नंबर नोंदणी करून बनावट रॉयल्टीच्या बारकोड स्कॅन करून ओरिजनल इनवाईस नंबर दिले गेले. जर बारकोड नंबर अनुक्रमे नसते तर बनावट रॉयल्ट्याचे बारकोड नंबर स्कॅन झालेच नसते आणि तर बवावट रॉयल्टीवर ओरिजनल इनवाईस नंबर भेटलेच नसते. यामुळेच शौर्या टेक्नोशॉप कंपनी गोपनीयतेचा भंग करत आहे.
जप्त करण्यात आलेल्या रॉयल्टया बनावट
अभिजित मास्कर यांनी वाहन धारकाकडून जप्त केलेल्या सर्व रॉयल्ट्या बनावट आहेत असा खुलासा शौर्या टेक्नोशॉप कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर प्रमोद पाटील यांनी केला आहे. त्यांनी ओरिजन आणि बनावट कसे ओळखावे हे प्रात्यक्षिक करून दाखविले. ओरिजनल रॉयल्टी हे चेक्स पेपरने तयार केले असून रॉयल्टीमधील अशोक स्तंभाची छायाकृती लेजर लाईटमध्ये दिसते तर छापण्यात आलेला ट्रेडमार्क पाण्याने पुसतो. बनावट रॉयल्टीमध्ये अशोक स्तंभाची छायाकृती दिसत नाही आणि ट्रेडमार्क पुसला जात नाही.