महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शासनाने लावलेले निर्बंध हितासाठीच; विशेष पोलीस महानिरीक्षक मीना यांचे आवाहन

कोरोनामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे शासनाने लावलेले निर्बंध सर्वांच्या हितासाठीच आहेत. सर्वांनी त्याचे पालन करावे. जनतेचे संयम ठेवण्याची गरज आहे, असे अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंदकिशोर मीना यांनी म्हटले.

chandkishor meena
चंदकिशोर मीना

By

Published : Apr 7, 2021, 11:15 AM IST

बुलडाणा : 'आपल्याला माहीत आहे, एका वर्षांपासून आपण कोरोनाशी लढत आहोत. माझे सर्वांना आवाहन आहे, की नागरिकांनी संयम ठेवण्याची गरज आहे. जे काही शासनातर्फे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, त्याचे पालन करावे. ते नागरिकांच्या हिसासाठीच आहे', असे आवाहन अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंदकिशोर मीना यांनी बुलडाण्यात केले. ते 6 एप्रिलला मासिक आढावा घेण्यासाठी बुलडाण्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेला आवाहन केले.

शासनाने लावलेले निर्बंध हितासाठीच

कोरोना संख्या कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा

अमरावती विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंदकिशोर मीना म्हणाले की, 'बुलडाण्यामध्ये कोरोना रुग्णाची संख्या जास्त आहे. त्याच्या पाठीमागचे कारण काय आहे? हे पण शोधण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यावर काय उपाययोजना करता येतील? याबद्दलही अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. प्रत्येक विभागासाठी काही गाईडलाईन्स निश्चित करण्यात आलेल्या आहेत. जसे वाहतुकीच्या नियमांनुसार 5 लोक एकसाथ जाऊ शकत नाहीत. याची उपाययोजना पोलिसांना करायची आहे. रात्री संचरबंदीची उपाययोजना पोलीस विभागाला करायची आहे. त्या सर्व बाबींची कशाप्रकारे योग्यरीत्या दिलेल्या नियमांप्रमाणे अंमलबजावणी होईल? याबाबत पोलीस अधिक्षक आणि त्यांच्या टीमसोबत चर्चा झाली. येणाऱ्या काळामध्ये कुठे ना कुठे कोरोना रूग्णसंख्येत कमतरता होईल, अशी अपेक्षा आहे. आपण एका वर्षांपासून कोरोनाशी लढत आहे'.

अवैध धंद्याबाबत दिल्या सूचना

खामगाव तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत निनावी तक्रार आल्या आहेत. या संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना विशेष पोलीस महानिरीक्षक चंदकिशोर मीना म्हणाले की, 'निनावी पत्राबद्दल मी येथे प्रतिक्रिया व्यक्त करणार नाही. पण, जिल्ह्यामध्ये काय चालते? काय चालत नाही? याची आम्हाला निनावी देण्याची गरज नाही. ज्या सूचना मला द्यायच्या होत्या त्या देण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काळात याची सुधारणा होईल याची अपेक्षा आहे'.

11 पैकी 9 कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

11 पैकी 9 कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

अमरावती परिक्षेत्रातील 11 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यातील 9 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार 50 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. दोन कर्मचाऱ्यांचे प्रकरण प्रस्तावित आहे. आणखी एकाचा प्रस्ताव द्यायचा आहे, असेही चंदकिशोर मीना यांनी म्हटले. यावेळी त्यांनी नवीन बांधण्यात आलेल्या पोलीस कँटीनची पाहणी केली. त्यांच्यासोबत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, गृह उपअधीक्षक ताथोड, बुलडाणा उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते, बुलडाणा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे, बुलडाणा ग्रामीण ठाण्याचे ठाणेदार सारंग नवलकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -विमान प्रवाशांनी कोरोना नियम मोडल्यास कठोर कारवाई; मुंबई पालिकेची सुधारित नियमावली

हेही वाचा -मुंबई उच्च न्यायालयाचा चीनी 'बाईटडान्स'ला दणका

ABOUT THE AUTHOR

...view details