बुलडाणा - रयत क्रांती संघटनेने विधानसभेसाठी बारा जागा मागितल्या आहेत. यात बुलडाण्यातील मेहकर आणि चिखली येथील दोन जागा लढवणार असल्याची माहिती कृषी व फलोत्पादन मंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिली. बुलडाणा दौऱ्यावर आले असताना माध्यमांसोबत बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
रयत क्रांती संघटनेची विधानसभेसाठी १२ जागांची मागणी - सदाभाऊ खोत - राज्यमंत्री सदाभाऊ खोत
आगामी विधानसभेसाठी रयत क्रांती संघटनेने १२ जागांची मागणी केली आहे. अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व कृषी फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज दिली.
राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाण्याच्या मालविहिर येथे शेतीची पाहणी करत शेतातील सोयाबीनला डवरणी केली. या वेळी शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली , मेहकर , लोणारसह इतर तालुक्यात शेतकऱ्यांनी औषध फवारणी केल्यानंतर त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी बियानेच उगवले नाही. याची दखल घेत राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज चिखली तालुक्यातील 3 कृषी केंद्राचे परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभेच्या तयारी बाबत विचारले असता, रयत क्रांती संघटनेने विधानसभेसाठी 12 जागा मागितल्या आहेत. अशी माहिती त्यांनी दिली.