बुलडाणा- खरीप हंगाम तोंडावर आल्याने आणि निर्बंधात शिथिलता मिळाल्याने आज (2 जून) बियाणे महामंडळाच्या कार्यालयाबाहेर बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी एकच गोंधळ केला. बियाणे कमी असल्याने लवकर संपणार अफवेने शेकडो शेतकऱ्यांची बियाणे महामंडळाच्या कार्यालयाबाहेर लांब रांग लावली होती. यामुळे बियाणे महामंडळाच्या अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाल्याने त्यांचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले. यावेळी मात्र कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक यांनी बियाणे महामंडळाच्या कार्यालयात भेट देऊन बियाण्यांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे सांगत शेतकऱ्यांचे गैरसमज दूर केले.
बियाणे खरेदीसाठी महामंडळ कार्यालयाबाहेर शेकडो शेतकऱ्यांनी गर्दी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा
बियाणे महामंडळाच्या कार्यालयाबाहेर बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांचा गोंधळ उडाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कोरोनाची परिस्थितीत सरकारने अगोदरच बियाणांचे नियोजन करायला पाहिजे होते. मात्र, कसलेही नियोजन नसल्याने गोंधळ होणारच त्यामुळे सरकारने तत्काळ राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने बियाणे उपलब्ध करून वाटप करावे अन्यथा पेरणीपूर्व स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा तुपकर यानी दिला आहे.
हेही वाचा -इंंग्रजी दारूसाठी काही पण! सीसीटीव्ही कॅमेरे फोडत पावणदोन लाखांची दारू लंपास