महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सत्ता स्थापनेच्या चर्चेत राजू शेट्टीना विश्वासात घेणे गरजेचे - रविकांत तुपकर - महाराष्ट्र सत्ता स्थापन तिढा

भाजपने राज्यात सरकार स्थापन करण्यास नकार कळवल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापने संदर्भात विचारणा केली आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत त्यांना सत्ता स्थापनेचा दावा करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेने आतापासूनच आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते

By

Published : Nov 11, 2019, 4:55 PM IST

बुलडाणा- शिवसेना आणि आघाडी यांच्या सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. तर यामध्ये आघाडीसोबत घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना कुठेही विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. तसेच स्वाभिमानी या सर्व चर्चेत सहभागी करून विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे मत स्वाभिमानीचे तुपकर यांनी व्यक्त केले आहे.

रविकांत तुपकर, स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते

हेही वाचा -बुलडाण्यात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी

भाजपने राज्यात सरकार स्थापन करण्यास नकार कळवल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापने संदर्भात विचारणा केली आहे. आज संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत त्यांना सत्ता स्थापनेचा दावा करावा लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेने आतापासूनच आकड्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

हेही वाचा - अयोध्या निकालाच्या पाश्वभूमीवर बुलडाण्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त, सोशल मिडियावरही असणार करडी नजर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आघाडीसोबत विधानसभा निवडणूक लढवली होती. तर आता शिवसेना आघाडीसोबत सत्ते संदर्भात राजू शेट्टी आपली भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे देखील तुपकर यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details