महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात दोन तास जोरदार पाऊस; एसटी कॉम्प्लेक्समध्ये घुसले पाणी

शहरात संततधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. नगर पालिकेने नाल्यांची साफ-सफाई न केल्याने बस स्थानक जवळील एसटी बस कॉम्प्लेक्स मध्ये तळमजल्यातील सर्व दुकानांमध्ये पाणी साचले. यामुळे दुकानदारांचे बरेच नुकसान झाले असून दुकानदारांनी नगर पालिकेला यासाठी जबाबदार ठरविले आहे.

पावसाचे पाणी साचले

By

Published : Jul 2, 2019, 11:59 PM IST

बुलडाणा - शहरात मंगळवारी झालेल्या संततधार पावसाने ठिकठिकाणी पाणी साचले. नगर पालिकेने नाल्यांची साफ-सफाई न केल्याने ही वेळ आल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.


बुलडाण्यात मंगळवारी 2 जुलै रोजी दुपारी 3:30 पासून दोन तास संततधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरात ठीक-ठीकाणी पाणी साचले तर बस स्थानक जवळील एसटी बस कॉम्प्लेक्स मध्ये तळमजल्यातील सर्व दुकानांमध्ये पाणी साचले. या साचलेल्या पाण्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. स्थानिक नगरपालिकेने वेळेतच नाल्यांची साफ-सफाई न केल्यामुळे कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याचा आरोप स्थानिक दुकानदारांनी केला आहे.

पावसाचे पाणी साचले


प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांनी 28 जून ते 2 जुलैपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात 25 ते 50 मिलीमीटर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता. आज मंगळवारी 2 जुलै रोजी बुलडाण्यासह आसपासच्या परिसरात दुपारी दोन तास जोरदार पाऊस पडला. या पावसाने परिसराच्या शेतीसह बुलडाणा शहरात मोठ्या प्रमाणात जागो-जागी पाणी साचले. स्थानिक बस स्थानक जवळील एसटी कॉम्प्लेक्समधील तळ मजल्यात टोंगळ्याएवढे पाणी साचले. हे पाणी कॉम्प्लेक्समधील दुकानात गेल्याने सर्व दुकानदारांचे नुकसान झाल्याचे समोर आले. तर, नगरपालिकेच्या नाल्यांची साफ-सफाई न केल्यामुळे कॉम्प्लेक्समध्ये पाणी साचल्याचे स्थानिक दुकानदारांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details