महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'राज्यातील सर्व खासगी कोविड रुग्णालयांचा दर्जा सरकारीच केला पाहिजे' - कोरोना रुग्णांचे उपचार

राज्यातील सर्व खासगी कोविड रुग्णालयांना अधिग्रहीत करून त्यांना शासकीय रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा. तसेच या रुग्णालयात राज्यातील कोरोना रुग्णांचे उपचार मोफतमध्ये करून त्याचे बिले 50 टक्के राज्य सरकारने आणि 50 टक्के केंद्र सरकारने करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

रविकांत तुपकर
रविकांत तुपकर

By

Published : Apr 30, 2021, 8:30 PM IST

बुलडाणा - राज्यात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. हे अचानक आलेले संकट आहे. याामध्ये सामान्य माणसाचा काहीही दोष नाही. शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन नाही. त्यामुळे जनतेला खासगी रुग्णालयात उपचार करण्याची वेळ आली आहे. दोन वर्षांपासून असलेल्या कडक निर्बंधांमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उदयोग धंदे नाही, यामुळे सध्याच्या स्थितीत सामान्य जनतेकडे खासगी कोविड रुग्णालयात उपचारासाठी पैसा नाही, त्यामुळे राज्यातील सर्व खासगी कोविड रुग्णालयांना अधिग्रहीत करून त्यांना शासकीय रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा. तसेच या रुग्णालयात राज्यातील कोरोना रुग्णांचे उपचार मोफतमध्ये करून त्याचे बिले 50 टक्के राज्य सरकारने आणि 50 टक्के केंद्र सरकारने करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

'राज्यातील सर्व खासगी कोविड रुग्णालयांचा दर्जा सरकारीच केला पाहिजे'
खासगी कोविड रुग्णालय शासकीय झाल्याने काळाबाजारावर प्रतिबंध लागेलकोरोनाच्या वाढत असलेल्या रुग्णांमुळे बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली आहे. बेड्स, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा चढत्या भावाने विक्री सुरू असून काळाबाजार होत आहे. जर स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केलेल्या मागणीला राज्यातील सर्व खासगी कोविड रुग्णालय अधिग्रहीत करून या रुग्णालयाला शासकीय दर्जा मिळाला, तर बेड, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या सुरू असलेल्या काळाबाजारला मोठ्या प्रमाणात प्रतिबंध लागू शकतो.

ABOUT THE AUTHOR

...view details