बुलढाणा :दारूविक्रीतून सरकारला भरभक्कम महसूल मिळतो. दरम्यान थर्टी फर्स्ट या एक दिवसाकरिता मद्यपानासाठी परमिटरूम आणि देशी दारू विक्रेत्यांनी २९ हजार ८०० परवाने खरेदी केले असले तरी, थर्टीफस्टच्या पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरारी पथक करडी नजर ठेऊन असणार ( Police watch on illegal parties ) आहे.
Police Watch on Illegal Parties : परवाने असले तरीही अवैध पार्ट्यांवर पोलिसांचा राहणार वॉच - Bhrari Squad of State Excise Department
अवैध पार्ट्यांवर पोलिसांचा वॉच राहणार ( Police watch on illegal parties ) आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरारी पथक त्यावर कारवाई करणार ( Bhrari Squad of State Excise Department ) आहे. मद्य पिण्याचा परवाना नसल्यास देखील कारवाई होणार आहे.
पार्ट्यांवर कारवाई करण्यात येणार : उत्पादन शुल्क विभागाचा परवाना न घेताच होणाऱ्या पार्ट्यांवर कारवाई सुद्धा करण्यात येणार ( Action against lack of liquor license ) आहे. थर्टी फर्स्ट म्हटले की मांसाहार आणि दारू आलीच. दरम्यान या दिवशी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्री हे नवीन वर्षाच्या पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगितले. वाईन शॉप आणि देशी दारू दुकाने ही मध्यरात्री १ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाकडूनही ( Bhrari Squad of State Excise Department ) या परवानाधारकमध्ये विक्रीच्या ठिकाणी सतत तपासणी केली जाणार ( One day alcohol drinking license ) आहे. मद्य पिण्याचा परवाना नसेल तर ग्राहकासह हॉटेल मालकालाही दंड केला जाईल. एका व्यक्तीला देशी दारू पिण्यासाठी ५ रुपयांमध्ये एक दिवसीय परवाना दिला जातो. आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यात मद्यविक्री एकदिवसीय परवाने २९ हजार ८०० परमिट रूम आणि देशी रूम दारू विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.