महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारूसाठी लागणाऱ्या मोहफुलांच्या गोदामावर पोलिसांचा छापा; २० लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ आरोपी ताब्यात - खामगाव पोलीस ठाणे बातमी

खामगावातील टिळक पुतळ्याजवळील परिसरात गोडाऊनमधून मोहफुलांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती खांमगाव शहर पोलीसचे ठाणेदार सुनिल अंबुलकर यांना मिळाली. माहितीच्या आधार ठाणेदार अंबुलकर यांनी त्यांच्या पथकासह सापळा रचून संबंधित गोडाऊनवर सोमवारी छापा मारला.

दारूसाठी लागणाऱ्या मोहफुलांच्या गोडाऊनवर पोलिसांचा छापा
दारूसाठी लागणाऱ्या मोहफुलांच्या गोडाऊनवर पोलिसांचा छापा

By

Published : Apr 21, 2020, 2:46 PM IST

Updated : Apr 21, 2020, 3:17 PM IST

बुलडाणा - लॉकडाऊनच्या काळात बार, देशीदारू विक्रीवर बंदी असताना गावठी दारू ग्रामीण भागासह शहरात सर्रास विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. खामगावातील टिळक पुतळ्याजवलील अशाच एका गावठी दारू बनविण्याच्या उपयोगात येणाऱ्या मोहफुलांच्या गोडाऊनवर सोमवारी पोलिसांनी छापा मारून ५ आरोपींना ताब्यात घेतले असून २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दारूसाठी लागणाऱ्या मोहफुलांच्या गोदामावर पोलिसांचा छापा

खामगावातील टिळक पुतळ्याजवळील परिसरात गोडाऊनमधून मोहफुलांची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती खामगाव शहर पोलीसचे ठाणेदार सुनिल अंबुलकर यांना मिळाली. माहितीच्या आधार ठाणेदार अंबुलकर यांनी त्यांच्या पथकासह सापळा रचून संबंधित गोडाऊनवर सोमवारी छापा मारला. यावेळी ब्रिजमोहन गुप्ता व विपीन गुप्ता यांना रंगेहाथ पकडण्यात आले. तर, गोडाऊनमधून ४६८ पोते मोहफुलं, अंदाजे १६ लाख २४ हजार रुपये तसेच २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर, एकूण ५ आरोपींना ताब्यात घेतले गेले आहे. याप्रकरणी पुढील तपास खामगाव शहर पोलीस करत आहे.

Last Updated : Apr 21, 2020, 3:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details