बुलडाणा- कोरोनाचा विळखा राज्यात झपाट्याने वाढत असल्याने, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद केल्या आहेत. संचारबंदीही लागू केली आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यास कोणालाही मुभा नाही. त्यामुळे रस्त्यावरील मनोरुग्ण, भिकारी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी बुलडाणा पोलिसांनी पुढकार घेऊन अशा नागरिकांना अन्न वाटप केले जात आहे.
COVID19 : खाकीतली माणुसकी.. रस्त्यावरील नागरिकांना केले अन्नदान! - buldana corona news
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे खाकीवर्दीतील पोलिसांना विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना चोप देताना पाहिले असेल. मात्र, आता तेच पोलीस भुकेलेल्या मनोरुग्ण, भिकाऱ्यांना अन्न देत आहेत. बुलडाणा पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे यांच्या पुढाकारातून हे अन्न वाटप करण्यात आले.
हेही वाचा-'कोरोना विषाणूचा उगम चीनमध्ये झाला, यास पुरावा नाही' - चीनी दुतावास
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण जिल्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे खाकीवर्दीतील पोलिसांना विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांना चोप देताना पाहिले असेल. मात्र, आता तेच पोलीस भुकेलेल्या मनोरुग्ण, भिकाऱ्यांना अन्न देत आहेत. बुलडाणा पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कपाटे यांच्या पुढाकारातून हे अन्न वाटप करण्यात आले. दरम्यान, कपाटे हे गरीब व होतकरू तरुण-तरुणींसाठी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण व परीक्षा मोफत घेण्याचे कामही करतात.