महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pigs Infected With Swine Flu: बुलडाण्यात शेकडो डुकरांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू, बाधित क्षेत्रातील जिवंत डुकरे करणार नष्ट - राजेंद्र पाटील

Pigs Infected With Swine Flu : बुलडाण्यात डुक्करांना स्वाईन फ्ल्यूची लागण झालीय. शेकडो डुकरांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू देखील झालाय. खबरदारी म्हणून उर्वरित डुकरांना मारायला सुरुवात केलीय. याविषयी सविस्तर जाणून घेवूया.

Pigs Infected With Swine Flu
डूक्करांना स्वाईन फ्ल्यू

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 6:54 PM IST

Updated : Sep 9, 2023, 7:18 PM IST

बुलडाण्यात डुक्करांना स्वाईन फ्ल्यू

बुलडाणा Pigs Infected With Swine Flu : शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात डुक्करे मरण पावत होती. या दरम्यान एका डुकरांचं शवविच्छेदन केलं गेलं, अन् डुकरांच्या मृत्यूचं कारण तपासलं. तेव्हा या डुकरांचा मृत्यू 'स्वाईन फ्लू' या आजारानं होत असल्याचं समोर आलंय. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांवर पशुसंवर्धन विभाग आणि नगरपालिका मिळून बुलडाणा शहरातील बाधित क्षेत्रातील जिवंत डुक्करांना नष्ट करत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार बाधित क्षेत्रातील एक किलोमीटर परिसरातील सर्व डुकरेशास्त्रशुद्ध पद्धतीनं नष्ट केली जात आहेत.

पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाळत :यानंतरही दहा किलोमीटर परिसरामधील डुकरांवर पुढील काही दिवस पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाळत ठेवली जाणार आहे. यामध्ये काही डुकरांना आजार किंवा लक्षणे आढळल्यास त्या परिसरातील डुक्कर देखील नष्ट केली जातील, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलीय. (Pigs infected with swine flu in Buldhana) प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जातेय.


डुकरांच्या अवयवांचे नमुने तपासणी :बुलडाणा शहरात गेल्या महिन्याभरापासून हजारो डुकरांचा अचानक मृत्यू होतोय. याबाबत संशय आल्याने नगरपालिकेच्या वतीनं मेलेल्या डुकरांच्या अवयवांचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते. त्यानंतर या सर्व डुकरांचा मृत्यू 'आफ्रिकन स्वाइन फ्लू' या रोगामुळे झाल्याची माहिती समोर आलीय. हा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील सर्व डुकरांना मारण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिलेत. त्यानुसार नगरपालिकेनं आता सर्व डुकरांचा नायनाट करण्यासाठी दहा लोकांचं पथक देखील तयार केलंय, अशी माहिती देण्यात आलीय. (Buldhana Hundreds of pigs died)


डुकरांना मारण्याची प्रक्रिया : शहरातील सर्व डुक्कर मारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलीय. आफ्रिकन स्वाइन फ्लूपासून मानवी आरोग्याला कुठलाही धोका नाही, त्यामुळं नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही, असं आवाहन देखील यावेळी प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. (swine flu in Buldhana) परंतु यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.

हेही वाचा :

  1. Thane Municipality administration : ठाण्यात स्वाईन फ्ल्यून वाढत असल्याने नागरिकांमध्ये धास्ती; महापालिका प्रशासनाने केली आरोग्य यंत्रणा सक्षम
  2. मुंबईत आठवडाभरात डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टो, स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांत वाढ
  3. Mumbai Patients Hike मुंबईत मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांत वाढ सुरूच
Last Updated : Sep 9, 2023, 7:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details