बुलडाणा - चिखली येथे २७ एप्रिलच्या रात्री १ वाजताच्या सुमारास एका ९ वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली असून, दुसरा आरोपी फरार आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव सागर बोरकर (वय २८) असून तो गौरक्षण वाडी चिखली येथील रहिवासी आहे. सध्या या मुलीची प्रकृती अतिशय चिंताजनक असून पुढील उपचारासाठी तिला औरंगाबादला हलवण्यात आले आहे. दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणाप्रमाणे या मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
अनैसर्गिक अत्याचारांची परीसीमा, बुलडाण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार - arrest
चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली काम करणाऱ्या व तेथेच राहणाऱ्या एका कामगाराच्या ९ वर्षीय मुलीचे दोन युवकांनी शनिवारी २७ एप्रिलच्या मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान अपहरण करुन पळवून नेले.
चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली काम करणाऱ्या व तेथेच रहाणाऱ्या एका कामगाराच्या ९ वर्षीय मुलीला दोन युवकांनी शनिवारी २७ एप्रिलच्या मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान अपहरण करुन पळवून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिला मौनीबाबा संस्थानासमोर सोडण्यात आले. मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सागर बोरकर याला अटक करण्यात आली आहे. पण, दुसरा आरोपी अजून फरार आहे. आरोपी जवळून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन सुध्दा ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास ठाणेदार वाघ करीत आहेत. घटनेचे गांभीर्य पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी यांनी पोलीस स्थानकाला भेट दिली आहे. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असून, पुढील उपचारासाठी तिला औरंगाबादला हलविण्यात आले आहे.