बुलाडाणा - शेगावमध्ये असलेल्या डेपो जवळील वस्तीमध्ये रविवारी लग्न होते. या लग्नामध्ये रात्री अडीचच्या दरम्यान डीजे वाजवण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांनी याला विरोध केला. शेगाव पोलिसांकडे तक्रार केली. शेगाव पोलिसांनी येऊन या डीजेवाल्याला मारहाण करीत डीजे बंद केला. परंतु डीजेच्या गाण्यावर नाचणाऱ्या काही नागरिकांना ते पटले नाही. त्यांनी याला विरोध करीत शेगाव पोलीस ठाण्यात येऊन ठाण्यामध्ये तोडफोड केलीे. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी काही जणांना अटक केली असल्याचे समजते.
शेगावमध्ये रात्री डीजे न वाजवू दिल्यामुळे नागरिकांनी पोलिस ठाण्यात केली तोडफोड
शेगावमध्ये रात्री उशिरा डीजे सुरू होता. त्याचा त्रास झाल्याने नागरिकांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी कारवाई करत डीजे बंद केला. मात्र याला विरोध करत काही जणांनी पोलिस स्टेशनमध्येच धुडगूस घालून मोडतोड केली.
शेगावमधील एसटी डेपोजवळ असलेल्या वस्तीमध्ये लग्न सुरू होते. लग्नात रात्री उशिरा डीजे वाजविण्यात येत होता. या डीजेमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने त्यांनी यासंदर्भात शेगाव पोलिसांकडे तक्रार केल्याचे समजते. शेगाव पोलिसांनी येऊन हा डीजे बंद केला. डीजेवाल्यास ताब्यात घेतल्याची माहिती आहे. परंतु या लग्नांमध्ये असलेल्या काही नागरिकांनी त्याला विरोध केला व थेट पोलीस ठाण्यात येऊनच तोडफोड केल्याचे समजते. यामुळे वातावरण तंग झाले होते. शेगाव पोलिसांनी संबंधितांना अटक केली असल्याची माहिती आहे. पुढील कारवाई सुरू आहे. तोडफोड करणाऱ्यांमध्ये 4 ते 5 सैनिकांचा ही समावेश असल्याची माहिती आहे.