बुलडाणा -जिल्ह्यातील लोणार सरोवरानजीक किनगाव जट्टू रोडवर एका शेतात तार कंपाऊंड असलेल्या जाळीत बिबट्या अडकलेला नागरिकांना आढळून आला. ही घटना आज गुरुवारी ६ जानेवारीला सकाळच्या सुमारास आमोर आली. सहा तासानंतर वन विभागाने रेस्क्यूने बिबट्याची सुटका केली.
शेतातील कुंपनामध्ये अडकला बिबट्या, वन विभागाने केली सुटका - लोणार सरोवरानजीक शेतात तार कंपाऊंडच्या जाळीत बिबट्या
लोणार सरोवरानजीक शेतात तार कंपाऊंडच्या जाळीत बिबट्या अडकलेला नागरिकांना आढळून आला. ही घटना आज गुरुवारी ६ जानेवारीला सकाळच्या सुमारास आमोर आली. सहा तासानंतर वन विभागाने रेस्क्यूने बिबट्याची सुटका केली.
लोणार वन्यजीव अभयारण्यामधील एक बिबट्या सरोवराच्या काठावर असलेल्या किनगावजट्टू रोडवरी नगरपालिका उपाध्यक्ष बादशा खान यांच्या शेतात रात्रीच्या वेळी ताराच्या कुंपनामध्ये अडकला होता. याबाबतची माहीती शेतात काम करणाऱ्या मजुरांनी नगरपालीका उपाध्यक्ष यांना दिली. या घटनेची माहीती मिळताच बादशाखान यांनी वन्यजीव अभारण्याचे अधिकारी यांना कळविले. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरताच शहरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. शेतातील तार कुंपनामध्ये बिबट्याचा पाय अडकल्याने तो सुटकेसाठी प्रयत्न करीत होता. मात्र बघ्याची गर्दी असल्यामुळे तो घाबरला, शवेटी नागरिकांना हटविण्यासाठी वन्यजीव अभारण्यातील अधिकाऱ्यांनी पोलीसांना बोलविले होते.
वन्यजीव अभयारण्य अधिकारी यांनी बुलडाणा येथील उपवनसरंक्षक संजय माळी, सहाय्यक वनसरंक्षक रंजीत गायकवाड, गवारे, राहुल चव्हाण, समाधान मोरे, संदीप मंडावी , विलास मेरत, देविदास वाघ, पथकास पाठवून तब्बल तीन तासानंतर रेस्क्यू करून बिबट्याची सुटका केली. त्यानंतर बिबट्यास लोणार सरोवर अभारण्यात सोडण्यात आले. यावेळी वन्यजीव अभारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी जि.आर शिंदे, एस. जी. माळेख, के. बी. सरकटे, कैलास नागरे, सूरेश माने, गजानन शिंदे , आकाश शिंदे. मारोती मोरे उपस्थीत होते. यावेळी लोणार पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेद्र माळी, पोलीस उपनिरीक्षक अझहर शेख, उंकडराव राठोड, चंद्रशेखर मुरडकर, सुधाकर काळे, कैलास चतरकर, गजानन बनसोड आदी पोलिसांनी परिश्रम घेतले