महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव टिप्परच्या धडकेत एकाचा मृत्यू - road accident news

भरधाव टिप्परने एकस चिराडल्याची घटना खामगाव येथील कॅनरा बँकेसमोर बुधवारी (दि. 8 जुलै) दुपारच्या सुमारास घडली

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

By

Published : Jul 9, 2020, 12:55 AM IST

बुलडाणा - भरधाव टिप्परने एकस चिराडल्याची घटना खामगाव येथील कॅनरा बँकेसमोर बुधवारी (दि. 8 जुलै) दुपारच्या सुमारास घडली. कैलास तुळशीराम आखरे (वय 38 वर्षे रा. हिरवा मांडका), असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

कैलास हे आपला भाऊ रामेश्वरसह बँकेत कामानिमित्त आले होते. बँकेबाहेर रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या टिप्परने (क्र. एम एच 28 बीबी 1818) कैलास यांना धडक दिली. या धडकेत कैलास यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने टिप्परसह पळ काढला. खामगाव पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवल्यानंतर टिप्पर व चालकाचा शोध घेतला. या प्रकरणी टिप्पर चालक विजय भिकाजी वानखडे (रा. शिरजगाव देशमुख) यास टिप्परसह पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा -वनविभागाने 8 फूट लांबीचे अजगर केले रेस्क्यू...

ABOUT THE AUTHOR

...view details