महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने मजुराचा मृत्यू, 2 गंभीर जखमी

बुलडाणा जिल्ह्यातील ब्राम्हदा गावच्या हिवरी धरण शिवारातील एका विहिरीत ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणारा ट्रॅक्टर अचानक पडल्याने या अपघातात एक मजुरांचा मृत्यू तर २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

घटनास्थळावरील छायाचित्र

By

Published : Jun 1, 2019, 12:55 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील ब्राम्हदा गावच्या हिवरी धरण शिवारातील एका विहिरीत खोदकाम सुरु होते. खोदकामाच्या ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणारा ट्रॅक्टर अचानक विहिरीत पडल्याने या अपघातात एका मजुरांचा मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

घटनास्ठळावरील माहिती देताना मजूर

ब्राम्हदा गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी नवीन विहिरीचे खोदकाम हिवरी धरण शिवारात सुरू असताना ब्लास्टिंगचे ट्रॅक्टर अचानक विहिरीत पडला. यावेळी विहीरीत 3 मजुर काम करत होते. त्यापैकी दोन मजूर गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी धामणगाव बढे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार केले. पण, प्रकृति चिंताजनक असल्याने त्यांना बुलडाणा येथे खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान प्रविण रामदास सोनोने (वय 26 वर्षे, रा.ब्राम्हदा) याचा मृत्यू झाला तर शिवाजी बाबुराव जाधव (वय 25 वर्षे, रा. ब्राम्हदा) याची प्रक्रुती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी तातडीने औरंगाबाद येथे हलविण्यात आले. शे. सईद शे. नजीर हा किरकोळ जखमी झाल्याने बुलडाणा येथे उपचार घेत आहे.


या विहिरीवर मंगेश सोनोने, पवण थोरात, संदीप हिवाळे, सतिष तायडे हे देखील काम करत होते. सुदैवाने यांचे प्राण वाचले या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी मदतीसाठी अनेकांनी धाव घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details