Omacron Threat Buldana : बुलडाणा जिल्ह्यावर ओमायक्रॉनचा धोका, त्या रूग्णाचे तिघे भाडेकरू कोरोना पॉझिटिव्ह - जिल्हा कोविड रुग्णालय
दुबई ‘रिर्टन’ (Dubai 'Return) ओमायक्रॉनग्रस्त (Omicron affected) रुग्ण बरे होऊन घरी गेले. परंतु त्यांच्या घरी भाड्याने राहणारे (Tenants) तीन जण कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आले आहेत. तिघांनाही जिल्हा कोविड रुग्णालयात (District Kovid Hospital) भरती करण्यात आले आहे. त्या रुग्णांच्या नातेवाईकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यावेळी त्यांच्या भाडेकरूंची कोरोना चाचणी करण्यात आली नव्हती. पॉझिटिव्ह आलेल्यांमधे भाडेकरू त्यांची बायको आणि मुलगा तिघेही पॉझिटिव्ह आले आहेत.
बुलडाणा: दुबई ‘रिर्टन’ ओमायक्रॉनग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. पण त्यांच्या घरी भाड्याने राहणारे तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे दुबईवरून आलेल्या ओमायक्रॉन रुग्णांच्या नातेवाईकांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यावेळी त्यांच्या भाडेकरूंची चाचणी करण्यात आली नव्हती.आश्चर्य म्हणजे भाडेकरूंना खोकला आल्यावर ते हॉस्पिटलला गेले त्यानंतर कोरोना चाचणीत ते निगेटिव्ह आले. त्यांचा स्कोअर वाढल्याने त्यांनी पुन्हा तीन दिवसांनी जेव्हा कोरोना चाचणी केली तेव्हा ते पॉझिटिव्ह आले. यात भाडेकरू, त्यांची बायको आणि मुलाचा समावेश आहे.तिघांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यावर पुन्हा ओमायक्रॉनचा धोका जाणवु लागला आहे.तर दुसरीकडे जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणा आणि नगर प्रशासन यंत्रणा ओमायक्रॉनबाबत गंभीर नसल्याचे समोर येत आहे.
ओमायक्रॉन चाचणी अनिवार्य
ओमायक्रॉन चाचणी करण्याविषयीचा निर्णय जिल्हा शल्य चिकित्सक घेणार आहेत. अर्थात ओमायक्रॉनग्रस्त घरमालकाच्या संपर्कातील हे तिघेही असल्यामुळे यांचीही ओमायक्रॉन चाचणी करणे नव्या गाईडलाईन्स नुसार अनिवार्य आहे. जर हे तिघेही ओमायक्रॉन चाचणीत पॉझिटिव्ह आले तर धोका वाढणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेला अलर्ट करणे तसेच इतर उपाययोजना आखाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.