बुलडाणा -राज्यात डेल्टा प्लसचे 10 रुग्ण सोमवारी आढळले आहेत. यातील सहा रुग्ण हे कोल्हापुरात आढळले आहेत. राज्यात एकूण रुग्णाची संख्या आता 76 झाली आहे. नागरिकांनी चिंता करण्याची काहीही गरज नाही मात्र सर्वांनी नियम पाळत काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. खांमगावच्या सिल्वर सिटी रुग्णालयात सुरू करण्यात येणाऱ्या एमआरआय आणि सिटीस्कॅनचे उद्घाटनसाठी टोपे आले होते. त्यांनी दिलीपकुमार सानंदा यांच्या निवासस्थानी भेट दिली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
कोरोना आणि डेल्टा प्लसच्या लक्षणात, उपचारामध्ये फरक नाही -
राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसचे 76 रुग्ण आढळले आहेत. रुग्णांची आणि संपर्कातील लोकांची तपासणी सुरू आहे. आरोग्य विभागाकडून दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यात 100 नागरिकांची तपासणी होत आहे, जे कोणी बाधित आढळत आहे त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात येत आहेत. कोरोना आणि डेल्टा प्लसच्या लक्षणात आणि उपचारांमध्ये फार काही फरक नाही. त्यामुळे चिंता करण्याचा विषय नसला तरी आपण काळजी घेतली पाहिजे, असे टोपे यावेळी म्हणाले.
नियमांचे पालन करण्याचे आवाहन -