बुलडाणा - लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्यावतीने डॉ. राजेंद्र शिंगणे तर भाजप - शिवसेनेच्यावतीने प्रतापराव जाधव यांनी आपली उमेदवारी आज दाखल केली. अर्ज भरताना दोन्ही उमेदवारांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन केले.
बुलडाणा : आघाडीतर्फे डॉ. राजेंद्र शिंगणे, युतीतर्फे प्रतापराव जाधव यांचे उमेदवारी अर्ज दाखल - lok sabha
लोकसभा निवडणुकीपूर्वीच लोणार नगरपरिषदेत काँग्रेसने सत्ता राखत शिवसेनेला मोठा झटका दिला. तर सिंदखेडराजा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला समान मत मिळाले, मात्र नगराध्यक्ष हा शिवसेनेचा निवडून आला. त्यामुळे येणाऱ्या काळातील लोकसभेचे चित्र अजूनही अस्पष्ट आहे.
डॉ. राजेंद्र शिंगणे, प्रतापराव जाधव
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांनी विद्यमानखासदार प्रतापराव जाधव यांच्यावर कडाडून टीका केली. प्रतापरावांच्या १० वर्षाच्या काळात अनेक प्रकल्प रखडले असून निष्क्रिय खासदार म्हणून जिल्हात त्यांची ओळख झाली असल्याचे शिंगणे म्हणाले. तर प्रतापराव जाधव यांनी ही निवडणूक विकासाच्या मुद्यांवर लढली जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांना केंद्रस्थानी ठेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचे जाधव म्हणाले.