महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाणी समस्येबाबत नगरपरिषदेची विशेष बैठक; घरगुंती पंप लावणाऱ्यांवर करणार कारवाई

उन्हाळा सुरू होताच ही पाणी पातळी अजूनच खाली गेल्याने लोकांच्या, विहिरी, बोरवेल आटल्यामुळे लोकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे.

घरगुंती पंप लावणाऱ्यांवर करणार कारवाई

By

Published : May 8, 2019, 10:57 AM IST

भंडारा -शहरालगत वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे, मात्र तरीही लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही, पाण्यासाठी लोकांना मोर्चे काढावे लागत आहेत. त्यासाठी नगरपरिषदेने तातडीने विशेष बैठक बोलविली. या बैठकीत पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी ७ टँकरद्वारे शहरात पाणी पुरवठा केला जाणार आहे. घरगुती छोटे पंप लावून पाणी भरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.

घरगुंती पंप लावणाऱ्यांवर करणार कारवाई

भंडारा शहराच्या लगतच वैनगंगा नदी आहे. येथे गोसे प्रकल्पाचे बॅक वॉटर असल्याने नदी दुथडी वाहत आहे. मात्र या पाण्यात नागपूरच्या नाग नदीतील गटराचे पाणी येत असल्याने हे पाणी दूषित झाले आहे. गटराच्या पाण्यामुळे पाण्याचे झरे बंद पडले आहेत, त्यामुळे नदी जवळ असूनही पाण्याची पातळी खाली आहे. उन्हाळा सुरू होताच ही पाणी पातळी अजूनच खाली गेल्याने लोकांच्या, विहिरी, बोरवेल आटल्यामुळे लोकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. १२३ वर्षे जुनी आणि १५ वर्षे पहिलेच कालबाह्य असलेल्या नळ योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. यामुळे कुठे गढूळ पाणी मिळते तर काही भागात पाणी पोहचत नाही. नगर परिषदेकडून योग्य पाणीपुरवठा होत नसल्याने लोकांनी नगरपरिषदे विरोधात मोर्चे काढले, घागर फोडल्या. लोकांचा संताप लक्षात येताच नगर पालिकेने तातडीची बैठक बोलाविली आणि काही उपाय योजना आखण्यात आल्या.

गेल्या वर्षीही पाण्याची समस्या उद्धभवली होती. मात्र, तेव्हा कसल्याही प्रकारचा ठराव न घेता नगरसेवकांनी स्वतःच्या टँकरने पाणीपुरवठा केला होता. यावर्षी ६ महिन्यांपूर्वीच सभेत पाणीपुरवठ्याबाबत ठराव घेत टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्याधिकाऱयांच्या वेळकाडू धोरणामुळे एप्रिल महिना संपल्यावरही टँकर उपल्बध होऊ शकले नाही, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी केला. पाणी समस्येचे निवारण करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत विरोधकांनी अध्यक्ष आणि मुख्याधिकारी आणि पाणी पुरवठा विभागातील लोकांना धारेवर धरले.

शहारत खात रोडवरील परिसरात पाण्याची भीषण परिस्थिीत निर्माण झाली आहे. या परिसरातील ७० ते ८० टक्के घराचे बोर आटले आहेत. बैठकीत ठरल्याप्रमाणे नगर परिषदचे दोन टँकर आणि खाजगी ५ टँकर, अशा ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. दिवसाला १ टँकर ४ फेऱ्या मारणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष स्वतः भाजपचे उमेदवार असल्याने ते आणि सर्व नगरसेवक हे निवडणुकीत व्यस्त असल्याने पाणी प्रश्नाकडे त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आणि त्याचा त्रास मात्र लोकांना सहन करावा लागला.

ABOUT THE AUTHOR

...view details