बुलडाणा- खामगाव तालुक्यातील रोहणा येथे माय-लेकीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून सुनंदा नामदेव निमकडे आणि शारदा पुंडलिक रोठे, अशी मृतांची नावे आहेत.
सुनंदा या त्यांची मुलगी शारदा हिच्यासोबत तिच्या सासरी राहत होत्या. गेल्या ३ जूनपासून दोघीही सकाळपासून घरातून बेपत्ता होत्या. दोघीही दुपारपर्यंत घरी परत न आल्याने शारदाच्या नवऱयाचा मोठा भाऊ ज्ञानदेव त्यांना शोधण्यासाठी गेला. मात्र, कुठेही त्यांचा शोध लागला नाही. अखेर त्या गावातीलच एका विहिरीमधील पाण्यात मृत अवस्थेत तरंगताना दिसून आल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघींचेही मृतदेह बाहेर काढले. यावेळी मृत शारदाजवळ एक चिठ्ठी सापडली.