बुलडाणा- मेहकरमधील इमामवाडा येथील गोडाउनमधून १७ मार्चला अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६ लाख किमतीची ७५ बॅग तंबाखु चोरी केली होती. याबाबत गोडाऊनचे मालक मोहमंद जुबेर यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. आता आरोपींना ताब्यात घेण्यात मेहकर पोलिसांनी यश आले आहे.
मेहकरमध्ये ६ लाखांची तंबाखू चोरी, आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश - robbery
१७ मार्चला अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६ लाख किमतीची ७५ बॅग तंबाखु चोरी केली होती. आता आरोपींना ताब्यात घेण्यात मेहकर पोलिसांनी यश आले आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासात मेहकर पोलिसांनी संशयीत आरोपी असमत अली तमीज रा.महात्मा फुले नगर, रिसोड याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यासोबतच आपल्यासोबत असलेल्या दुसऱ्या गुन्हेगाराची माहितीही दिल्याने दुसरा आरोपी अब्दुल नावेद अब्दुल समद यास ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेली तंबाखू आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना विद्यमान न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यासोबतच गुन्ह्याचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहे.