महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा स्त्री रुग्णालयात सोयी-सुविधांचा अभाव; क्वारंटाईन असलेल्या नगराध्यक्षांनीच केली तक्रार - buldana corona update

मलकापूर येथील कोरोनाबाित रुग्णाच्या संपर्कात आल्याने मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ हे स्वतः क्वारंटाईन झाले आहेत. त्यांनी बुलडाणा स्त्री रुग्णालयातील सोयी-सुविधांवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे.

buldana corona update
बुलडाणा स्त्री रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव; क्वारंटाईन असलेल्या नगराध्यक्षांनीच केली तक्रार

By

Published : Apr 12, 2020, 5:37 PM IST

बुलडाणा -कोरोना संभाव्य तथा बाधित ररुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या स्त्री रुग्णालयात आयसोलेशन आणि क्वारंटाईन विभागात रुग्णांसाठी सुविधेचा अभाव असल्याची तक्रार स्वतः आयसोलेशनमध्ये असलेल्या नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी केली आहे. त्यांनी रुग्णालयातील असुविधांबाबतची व्हिडिओ क्लिप तयार करून हे आरोप केले आहे. रुग्णालयात 24 तासात साफ-सफाई नाही, बाथरूममध्ये पाण्याची व्यवस्था नाही. गंभीर म्हणजे रुग्णांना दिले जाणारे भोजन चक्क जमिनीवर ठेवून दिले जात असून, वेळेवर भोजनही येत नसल्याचे त्यांची तक्रार आहे.

रुग्ण बरे होण्याऐवजी रुग्ण आणखी सिरिअस होऊ शकतो अशी भीती नगराध्यक्षांनी व्यक्त केली आहे. यामुळे क्वारंटाईन करण्यात आलेल्या रुग्णांप्रती प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाण्यात टीबी रुग्णालयजवळ बांधण्यात आलेल्या स्त्री रुग्णालयात कोरोना संभाव्य रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सध्या रुग्णालयात 91 रुग्ण क्वारंटाईन केलेले आहेत. यामध्ये मलकापूर येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ हे स्वतः क्वारंटाईन झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details