बुलडाणा :एसटी बस आणि कंटेनरच्या झालेल्या भीषण अपघातात सात प्रवाशी ठार तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी 23 मे रोजी सकाळी सिंदखेड राजा ते मेहकर दरम्यान असलेल्या पळसखेड चक्का गावाजवळ घडली. ही बस पुणे नागपूर महामार्गावरुन मेहकरकडे जात होती. मात्र कंटेनर आडवा आल्याने बसचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.
कंटेनर आडवा आल्याने चार प्रवाशी ठार :पुण्यावरुन मेहकरकडे जाणाऱ्या एसटी बसला कंटेनर आडवा आल्याने भीषण अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. या अपघातात सात प्रवाशी ठार झाले, तर 10 ते 15 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळावर बचाव कार्य सुरू आहे.
अपघातानंतर गावकरी आले धाऊन :पुण्यावरुन मेहकरला जाणाऱ्या एसटी बसला कंटेनर आडवा आल्याने जोरदार अपगात झाला. या अपघातात सात प्रवाशी ठार झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. जखमी नागरिकांनी आरडाओरड केल्यामुळे पळसखेड चक्का गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नागरिकांनी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.
चालकाचा जाग्यावरच मृत्यू :पुण्यावरुन मेहकरकडे येणारी बस क्रमांक एमएच 40 वाय 5802 ही बस पळसखेड चक्का या गावाजवळ आली असता, कंटेनर आडवा आला. त्यामुळे भरधाव वेगात असलेल्या बसमधील चालक राजू टी कुलाल ( वडगाव तेजन हल्ली मुक्काम हिवरा आश्रम ) हे जागीच ठार झाले. तर बसमधील तब्बल 10 ते 15 प्रवाशी गंभीर जखमी झाले. हा कंटेनर मेहकरकडून सिंदखेड राजाला जात होता.
हेही वाचा -
- Youth Beaten To Officer : वीज पुरवठा तोडल्याने तरुणाचा राग अनावर, वीज वितरण कार्यालयात कर्मचाऱ्याला मारहाण
- Thane Crime : धक्कादायक! भिवंडीतून तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण, पोलिसांचा शोध सुरू
- Pune Suicide News: एकाच कुटुंबातील तिघांचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू