बुलडाणा - जिल्ह्यात आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे घडली आहे. स्वतःच्या 65 वर्षीय आईवर 45 वर्षीय मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून तो सध्या फरार आहे.
मुलाने केला वृद्ध आईवर बलात्कार; बुलडाणा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार - बुलाडाणा गुन्हे वार्ता
बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे 65 वर्षीय आईवर 45 वर्षीय मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुलाने केला वृद्ध आईवर बलात्कार; बुलाडाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना
पत्नी माहेरी गेली असल्याने घेतला फायदा -
रायपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव सराई येथे हमाली करणाऱ्या एका 45 वर्षीय आरोपीने पत्नी माहेरी गेली असल्याने आई एकटीच घरी असल्याचा फायदा घेत 5 जूनच्या रात्री अत्याचार केला. याप्रकरणी महिलेने 7 जून रोजी रायपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे या आरोपीला मुलगा व मुलगी असून मुलीचे लग्न सुद्धा झाले आहे.
Last Updated : Jun 6, 2021, 9:40 PM IST