बुलडाणा- बुलडाणा लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी मराठा आणि माळी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. थोड्यावेळापूर्वीच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे, युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आमदार बळीराम शिरस्कार यांच्यात तिरंगी लढत होत आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी मराठा आणि माळी समाजाची मते निर्णायक ठरणार आहेत. ही लढत अत्यंत चुरशीची मानली जात आहे. यामध्ये आता कोण बाजी मारणार हे थोड्यात वेळात स्पष्ट होईल.
Live Updates -
- २.५५ pm -प्रतापराव जाधव ७३१५७ ने आघाडी
- १२.१८ pm - प्रतापराव जाधव यांची ४२३२५ मतांची आघाडी
- ११.१२ am - शिवसेनेची २४ हजार मतांची आघाडी
अकराव्या फेरीअंतीही शिवसेनाच आघाडीवर
- शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांची २२ हजार १५९ मतांची आघाडी
- शिवसेना - प्रतापराव जाधव- ७६ हजार ८२०
- राष्ट्रवादी - रांजेंद्र शिंगणे - ५४ हजार ६६
- वंचित बहुजन आघाडी - बळीराम शिरस्कार - २२ हजार ८५७
मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीतही प्रतापराव जाधवांची आघाडी
- शिवसेना - प्रतापराव जाधव- ४२२९५
- राष्ट्रवादी - रांजेंद्र शिंगणे - २९६५७
- वंचित बहुजन आघाडी - बळीराम शिरस्कार - १३०३१
मतमोजणीची पहिली फेरी
- शिवसेना - प्रतापराव जाधव- १०५४५
- राष्ट्रवादी - रांजेंद्र शिंगणे - ९०६८
- वंचित बहुजन आघाडी - बळीराम शिरस्कार - ४२२०
- ९.४२ am - शिवसेनेचे प्रतापराव जाधव आघाडीवर
- सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.