बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथे एका स्त्री जातीचे अर्भक नदीत फेकून दिल्याची घटना गुरुवारी 9 जुलैच्या रात्री समोर आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अर्भक ताब्यात घेतले. अकस्माक मृत्यूची नोंदही केली. मात्र, शवविच्छेदनानंतर ते कपड्याची बाहुली असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यामध्ये चांगलीच चर्चा रंगली होती.
अर्भक समजून अकस्मात मृत्यूची केली नोंद, पण निघाली बाहुली - बुलडाणा अर्भक अन् बाहुली बातमी
खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत बोरजवळा हे गाव येते. याच गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नाना तोमर हे शेतातून घरी जात असताना त्यांना नदीमध्ये एक स्त्री जातीचे अर्भक तरंगताना दिसले. याबाबत त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या अर्भकाला बाहेर काढून पंचानामा करण्यात आला.
खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत बोरजवळा हे गाव येते. याच गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नाना तोमर हे शेतातून घरी जात असताना त्यांना नदीमध्ये एक स्त्री जातीचे अर्भक तरंगताना दिसले. याबाबत त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांना माहिती दिली. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या अर्भकाला बाहेर काढून पंचानामा करण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. संबंधित अर्भक कोणी फेकले व हे कोणाचे आहे? याची तपासणी करण्यासाठी शवविच्छेदन करून डीएनए घ्यावा लागतो. त्यासाठी शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी संबंधित अर्भकाचे शवविच्छेदन करण्यास सुरुवात केली. मात्र, ती कपड्याची बाहुली असल्याचे समोर आले. त्यामुळे जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली होती.