महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा; नकली सोने तारण ठेवून जिजामाता सहकारी बॅंकेला 28 लाखांचा चुना - नकली सोने तारण बातमी बुलडाणा

बुलडाणा येथील जिजामाता महिला नागरी सहकारी बॅंकेतून 2 वर्षा अगोदर 10 कर्जदारांनी सोने तारणवर 16 कर्ज प्रकरण करून जवळपास 28 लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जात नियमित भरणा न केल्यामुळे कर्जदारांना वेळो-वेळी भरणा करण्यासाठी बॅंकेतून नोटीस देण्यात आली.

jijamata-womens-co-operative-bank-fraud-by-10-gold-mortgage
नकली सोने तारण ठेवून जिजामाता सहकारी बॅंकेला 28 लाखांचा चुना

By

Published : Dec 16, 2019, 8:05 PM IST

बुलडाणा -सोनेतारण कर्ज प्रकरणात बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिजामाता महिला नागरी सहकारी बॅंकेला सोने तारण कर्ज प्रकरणात 28 लाखांचा चुना लावण्यात आला आहे. 10 कर्जदारांनी नकली सोने तारण ठेवून कर्ज घेतले आहे. याप्रकरणी 6 जणांना अटक केली आहे. तर 5 जण फरार आहेत.

नकली सोने तारण ठेवून जिजामाता सहकारी बॅंकेला 28 लाखांचा चुना

हेही वाचा-मैत्रिणीने बोलावले असल्याचा बहाणा करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बुलडाणा येथील जिजामाता महिला नागरी सहकारी बॅंकेतून 2 वर्षा अगोदर 10 कर्जदारांनी सोने तारणवर 16 कर्ज प्रकरण करून जवळपास 28 लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जात नियमित भरणा न केल्यामुळे कर्जदारांना वेळो-वेळी भरणा करण्यासाठी बॅंकेतून नोटीस देण्यात आली. मात्र, तरीही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तारणांवर ठेवलेल्या सोन्याची तपासणी करण्यात आली. यावेळी सोने नकली असल्याचे उघड झाले. याप्रकरणी शाखा व्यवस्थापक दिपक अग्रवाल यांनी पोलिसांत तक्रार दिली. दिपक वर्मा या कर्मचाऱ्याने या सोन्याला असली असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. याप्रकरणी दिपक हरीश वर्मा, संजय शंकर मठारकर, मोहन खरात, मनोहर श्रीराम सावळे, कैनियालाल बद्री नारायण वर्मा, प्रविण रमाकांत वाडेकर यांना अटक करण्यात आले आहे. तर 5 आरोपी फरार आहेत. अटक आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुण्यावण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक अमित जाधव अधिक तपास करीत आहेत.

बँकेतील सोने तपासणाऱ्या कर्मचाऱ्याने तारण ठेवलेले सोने असली असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. जिजामाता महिला नागरी सहकारी बॅंकेत सोने तपासणारा दिपक वर्मा हा कर्मचारी बुलडाणा अर्बन पतसंस्थेत देखील नोकरीवर होता. त्यामुळे बुलडाणा अर्बन पतसंस्थेतून ही अशा प्रकारे नकली सोन्यावर कर्जाचे प्रकरण समोर येण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details