बुलडाणा - मागील पाच दिवसांपासून बुलडाणा अर्बन मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह संस्थेच्या मुख्य शाखेमध्ये आयकर विभागाच्या पथकाकडून चौकशी सुरू होती. यामध्ये अनेक अफवाही पसरवण्यात आल्या होत्या, मात्र, आयकर विभागाचा तो छापा नसून खात्यांची रुटींग चौकशी असल्याची माहिती बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी दिली आहे. तसेच संस्थेच्या खातेदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
- तो छापा नसून, खात्यांची तपासणी -
बुलडाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट संस्थेच्या बुलडाणा येथील मुख्य शाखेमध्ये मागील चार-पाच दिवसांपासून आयकर विभागाकडून तपासणी सुरू होती. यासंदर्भात काहीजणांनी छापा पडल्याची अफवा पसरवली होती. मात्र, बुलडाणा अर्बन संस्थेवर आयकर विभागाचा कुठलाही प्रकारचा छापा पडलेला नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या सुभाष शुगर हदगाव, एम. व्ही. शुगर्स उमरी, भाऊराव शुगर नांदेड, भाऊराव शुगर नांदेड या साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या कर्जाची चौकशी करण्यात आली आहे.
- ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित -