बुलडाणा -राज्याची विधानसभा निवडणूक दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी सांगली व लातूर येथे जाहीर सभा घेतल्यानंतर आज (शुक्रवारी) चिखली, बुलडाण्यात लोकांना त्यांनी संबोधले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. पवारसाहेब माझ्यावर आरोप करतात की आम्ही काही विकास केला नाही म्हणून परंतु, पवार साहेब आमच्याकडे विकासाचे एवढे मुद्दे आहेत. जे सात दिवस भागवत सप्ताह घेऊन सांगितले तरी मुद्दे संपणारे नाहीत.
आमच्याकडे भागवत सप्ताह चालण्या इतपत विकासाचे मुद्दे; अमित शाहांचे पवारांना प्रत्युत्तर - shah on article 370
राज्याची विधानसभा निवडणूक दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरूवारी सांगली व लातूर येथे जाहीर सभा घेतल्यानंतर आज (शुक्रवारी) चिखली, बुलडाण्यात लोकांना त्यांनी संबोधले.
अमित शाह यांच्या भाषणातील मुद्दे -
⦁ चिखली शहराचे ग्रामदैवत रेणुका मातेला नमन करून भाषणाला सुरुवात.
⦁ बुलडाणा जिल्हा हा जिजाऊ चे जन्मस्थान असून त्यांना प्रणाम केला.
⦁ जिल्ह्यातील शाहिदांचे शाह यांनी स्मरण केले.
⦁ मोदींजींनी प्रधानमंत्री होताच 370 हटवण्याचा इतिहासात्मक निर्णय घेतला.
⦁ संपुर्ण जगात नरेंद्र मोदी नावाचा गजर होत आहे.
⦁ ३७० संदर्भात गुलाम नबी आझाद म्हणाले होते. काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील. मात्र, रक्ताचा एक थेंबही सांडला नाही.
⦁ भाजप आणि शिवसेना उमेदवारांना मतं देण्याचं आवाहन
⦁ सर्जीकल स्ट्राईकमुळे पाकिस्तानला धडा शिकवला.
⦁ व्हाटस्अपवरून सगळ्यांना ३७० चे महत्व सांगणारे संदेश पाठवा.
⦁ काँग्रेसच्या काळात पाकिस्तानी घुसकोर जवानांचे मुंडके कापून नेत होते. त्यावेळी मनमोहनसिंग हे मौनीबाबा काही बोलत नव्हते अशी टीका अमित शहा यांनी केली.
⦁ मोदींचा जगात होत असलेला सन्मान हा मोदींजींचा नसून हा सव्वाशे कोटी नागरिकांचा आहे.
⦁ विदर्भातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारा कलम ३७० हटवल्याचे समर्थन करता की नाही.
⦁ शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे हे घराणेशाहीचं राजकारण करत आहेत.
⦁ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे राज्याच्या विकासासाठी नाही तर स्वत:च्या कुटुंबासाठी सत्ता करतात.