महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हिरा गोल्ड'च्या नोहेरा शेख पोलिसांच्या ताब्यात; पाच दिवसांची पोलीस कोठडी

हिरा ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या 'हिरा ग्रुप'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नोहेरा शेख यांना बुलडाणा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने नोहेरा शेख यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Hira Gold's company's ceo Nohera Sheikh  sent to Five-day police custody
हिरा गोल्डच्या नोहेरा शेख पोलिसांच्या ताब्यात; पाच दिवसांची पोलीस कोठडी

By

Published : Jan 11, 2020, 3:32 AM IST

बुलडाणा - संपूर्ण देशात 'हिरा ग्रुप ऑफ कंपनी'च्या माध्यमातून हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या हिरा ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नोहेरा शेख यांना बुलडाणा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने नोहेरा शेख यांना १४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हिरा गोल्डच्या नोहेरा शेख पोलिसांच्या ताब्यात; पाच दिवसांची पोलीस कोठडी

हैदराबाद येथील हिरा ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या, आणि ग्राहकांना जास्तीच्या पैशाचे अमिष दाखवून देशभरातील हजारो गुंतवणूकदारांना हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घालणाऱ्या या कंपनीविरोधात देशात अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

मुंबई येथील भायखळा पोलिसांनी कंपनीच्या नोहेरा शेख यांना अटक केल्यानतंर न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. २०१८ मध्ये सागवान येथील शेख नईम शेख अब्दुल नईम यांनीही १६ लाखांपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिल्याने नोहेरा शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणाची चौकशीची जबाबदारी स्थानिक आर्थिक गुन्हे शाखाकडे सोपविण्याता आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक दिलीप तडवी हे या प्रकरणाची चौकशी करीत आहे. दरम्यान नोहेरा शेख यांनी बुलडाणा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अटक पूर्व जामीन साठी अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज ७ जानेवारीला फेटाळल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे आदेश दिल्याने पोलिसांनी मुंबईतील भायखळ्य़ातील कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या नोहेरा शेख यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन जिल्हा सत्र न्यायालयात सादर केले.

दरम्यान, जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी डॉ. नोहेरा शेख यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर जिल्ह्यात याकंपनीच्या माध्यमातून अजूनही लाखों रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असुन अशा प्रकारे फसवणूक झालेल्या ग्राहकांना स्थानिक आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.

हेही वाचा - 'चांदा ते बांद्यापर्यंतच्या सर्वच माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करणार'

ABOUT THE AUTHOR

...view details