बुलडाणा - जिल्ह्यातील शेगाव येथील पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या एका दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना (बुधवारी १९ मे) रोजी दुपारी घडली. परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र, गाडीने अचानक पेट घतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
ऋषिकेश गुरव हे बहिणीला घेऊन दुचाकीने गजानन निमकवडा येथे जात होते. दरम्यान, शेगावच्या केवलराम पेट्रोल पंपावर त्यांनी दुपारी आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल टाकले. त्यानंतर दुचाकी पेट्रोल पंपासमोर उभी केली. दरम्यान, अचानक दुचाकीने पेट घेतला. यावेळी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेमुळे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.