महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालय व्‍यावसायिक आर्थिक संकटात - hall owner asking for compensation

वाढत्या कोरोना रुग्णांमूळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालय व्यवसायिक व संलग्न छोटेमोठे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना सरकारने आर्थिक पॅकेज देऊन भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा लॉन्स- मंगल कार्यालय चालक-मालक संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मंगल कार्यालय मालक अडचणीत
मंगल कार्यालय मालक अडचणीत

By

Published : May 7, 2021, 9:43 AM IST

बुलडाणा - वाढत्या कोरोना रुग्णांमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मंगल कार्यालय व्यवसायिक व संलग्न छोटेमोठे व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना सरकारने आर्थिक पॅकेज देऊन भरपाई द्यावी, अशी मागणी जिल्हा लॉन्स- मंगल कार्यालय चालक-मालक संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 3 मे रोजी बुलडाणा येथील मंगल कार्यालय व्यावसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कायस्थ यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली. तसेच जिल्हाधिकारी शंकर रामामुर्थी यांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले.

सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी
या केल्या मागण्या...

निवेदनात म्हटले आहे, की विवाहकार्य सुरळीत होण्यासाठी सरकारने पावले उचलावीत. कोरोना प्रादुर्भावामुळे मंगल कार्यालयासंबंधी नियमावली तयार करावी. नियमांचे पालन करून क्षमतेपेक्षा 50 टक्के क्षमतेने किंवा 200 लोकांच्या उपस्थितीची सरसकट परवानगी द्यावी. मार्च 2020 पासून मार्च 2021 पर्यंत कर्ज सरसकट माफ करावे. लॉन्समालक-चालक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करू नये या मागण्या केल्या आहेत. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कायस्थ, जिल्हा कार्याध्यक्ष संजय मैंद, जिल्हा सचिव दिलीप जाधव पाटील यांच्या सह्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details