बुलडाणा - शुक्रवारी केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर झाला. हा अर्थसंकल्प सराफा व्यावसायिकांसाठी काळा दिवस असून 'सोनारोकी भूल कमल का फुल' हा नारा सरकार ने सत्यात उतरवला आहे. असे म्हणत सरकार ने सोन्यावर वाढवलेली कस्टम ड्युटी कमी करावी अशी मागणी बुलडाणा सराफा असोसिएशन कडून करण्यात आली असून सरकारचा निषेधही करण्यात आला आहे.
हा अर्थसंकल्प म्हणजे सराफा व्यापाऱ्यांसाठी काळा दिवस; असोसिएशनकडून निषेध
हा अर्थसंकल्प सराफा व्यावसायिकांसाठी काळा दिवस असून 'सोनारोकी भूल कमल का फुल' हा नारा सरकार ने सत्यात उतरवला आहे. असे म्हणत सरकार ने सोन्यावर वाढवलेली कस्टम ड्युटी कमी करण्याची मागणी बुलडाणा सराफा असोसिएशन कडून करण्यात आली असून सरकारचा निषेधही करण्यात आला.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सोन्यावरील कस्टम ड्युटी अडीच टक्क्यांनी वाढवली आणि 1 कोटी रुपयांवर 2 टक्के छुपा सर्च यार्ड लावला आहे. यामुळे सराफा व्यावसायिकांचे व्यवसाय उध्वस्त होणार आहे. तर, या वाढलेल्या चाडेचार टक्क्यांच्या सर्व बोजा हा सर्वसामान्य नागरिकांवर पडणार असून त्यांच्यासाठी हा निर्णय अन्यायकारक आहे. विदेशातून येणाऱ्या दागिन्यांवर वर 30 ते 35 टक्के कपात आहे. मात्र, ही ज्वेलरी सर्व सामान्य ग्राहक खरेदी करत नसून उच्चभ्रू लोक खरेदी करतात, त्यावर त्यांना कुठलाच भुर्दंड दिलेला नाही. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला नक्कीच कात्री बसणार असून भारतीय चलनाला याचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे सरकार ने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सराफा असोसिएशनचे जिल्हा सचिव अनिल वर्मा यांनी केली आहे.
या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य नागरिक व मध्यम व्यापाऱ्यांना GST मध्ये बदल होईल अशा खूप मोठ्या अपेक्षा होत्या मात्र त्यात काहीच बदल झाला नाही. उलट पेट्रोल डीझल वरील टॅक्स वाढवल्याने सर्वसामान्य नागरीकांना झळ पोहचेल असाच हा अर्थसंकल्प असल्याचे सनदी लेखापालांचे म्हणणे आहे.