बुलडाणा - पश्चिम महाराष्ट्रातील ३ जिल्ह्यात महापुराच्या तडाख्याने संसार उध्वस्त झाले आहेत. तेथील जनजीवन पुर्वस्थितीत येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. पूरग्रस्तांसाठी १ कोटी ११ लाखाची मदत श्री गजानन महाराज संस्थानकडून करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
गजानन महाराज संस्थानाकडून पूरग्रस्तांना मदत; १ कोटी ११ लाखांचा मदतनिधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द - kolhapur sangali flood
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेगाव येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आले असता गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
गजानन महाराज संस्थानाकडून पूरग्रस्तांना मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेगाव येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आले असता गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी श्री गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त निळकंठ पाटील यांनी मुख्यमंत्र्याकडे पूरग्रस्तांसाठी मदत सोपवली. यावेळी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे, डॉ संजय कुटे, गिरीष महाजन, डॉ. रणजित पाटील उपस्थित होते.