बुलढाणा :दोन वर्षाच्या अवधीनंतर शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरामधून संत श्री गजानन महाराजांची पालखी (Palkhi of Gajanan Maharaj) आज सकाळी मार्गस्थ झाली. विठ्ठल रुक्माईच्या गजरात भजनी, दिंडी, अश्व, हाथी आणि ७०० वारकऱ्यांसह पायदळ वारी निघाली आहे. मंदिरात पालखीचे विधिवत पूजन केल्यानंतर मंदिराला ही पालखी आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरकडे रवाना झाली आहे.
पायी वारीचा अभिनव उपक्रम : संपुर्ण महाराष्ट्रातून श्री क्षेत्र पंढरपूरला सर्व संताच्या पालख्या दिंडीसह नेण्याची परंपरा आहे. भक्त आणि भाविकांना तीर्थयात्रा घडाव्यात. तसेच वारकरी संप्रदायाच्या महान परंपरेची जपणूक व्हावी या उद्देशाने या पालखिचे १९६८ पासून आयोजन करण्यात येत आहे. मंदिराच्या विश्वस्त यांनी महाराजांची पूजा केली. आज पहाटे आरती आटोपून पालखी पंढरपूर करीता रवाना झाली आहे.
पालखीचे जंगी स्वागत :अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस येथे सोमवारी पालखीचा मुक्काम होता. गत ४ दशकापासून गजानन महाराज शेगाव पालखी सत्कार समितीच्या वतीने (Gajanan Maharaj Shegaon) पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. सर्व भक्तांनी शिस्तबद्द पध्दतीने महाराजांचे दर्शन (Devotees visit) Maharajघेतले आहे.