बुलडाणा - 'गण गण गणात बोते' च्या गजरात शेगाव येथे संत श्री गजानन महाराजांचा १४२ वा प्रकटदिन लाखो भाविकांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रकटदिन उत्सवाला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून उद्या १६ फेब्रुवारीला काल्याच्या किर्तनानंतर समाप्ती होणार आहे.
शेगावात भरला भक्तांचा मेळा हेही वाचा -राज ठाकरेंची अवस्था 'तुम्हारे खत में हमारा सलाम'; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची खरमरीत टीका
या सोहळ्यादरम्यान राज्यभरातील जवळपास १ हजारांच्यावर दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. भाविकांचीही मोठी गर्दी सध्या विदर्भाच्या पंढरीत पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. अत्यंत शिस्तीत भक्त श्रींचे दर्शन घेत आहेत. आज दुपारी १२ वाजता गुलाब पुष्प, गुलाल उधळून हा सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 'महारुद्रस्वाहाकार' यज्ञाची पुर्णाहूती संपन्न झाली. संस्थानच्या वतीने २ लाखांच्यावर भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
शेगावात भरला भक्तांचा मेळा दुपारी २ वाजता श्रींच्या पालखीची रथ मेणा, गज, अश्वांसह नगर परिक्रमा काढण्यात आली. दत्त मंदिर, हरहर शिव मंदिर श्री शितलनाथ महाराज मंदिर, फुलेनगर श्रींचे प्रकटस्थळ, श्री मारोती मंदिर बाजार विभाग, बसस्थानक व्यापारपेठ मार्गे या पालखीने प्रवास केला. यावेळी शहरात ठिकठिकाणी भक्तांच्या वतीने वारकर्यांना चहा, न्याहारी, फराळ आणि महाप्रसाद वितरीत करण्यात आला. अनेकांनी श्रींच्या पालखीवर पुष्पवृष्टी केली. प्रकट दिनानिमित्त भाविकांची झालेली गर्दी पाहता पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.